Crime News : कॉफीमध्ये गुंगीचे औषध देऊन बलात्कार; खराडीतील घटनेने खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Crime News : कॉफीमध्ये गुंगीचे औषध देऊन बलात्कार; खराडीतील घटनेने खळबळ

Pune Crime News : कॉफीमध्ये गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत असून, वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अजयसिंग विजयसिंग ठाकूर (३१) असं अटक केली आहे.

हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

हेही वाचा: 80 वर्षीय चित्रकाराचा अल्पवयीन मुलीवर 'डिजिटल रेप'; Digital Rape म्हणजे काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली होती. त्यानंतर तो दुसऱ्या नोकरीच्या शोधात होता. त्यावेळी त्याची पीडित महिलेशी एका मित्रामार्फेत ओळख झाली. फिर्यादी महिलेचा केटरिंग व्यवसाय होता. त्यामुळे आरोपी आणि फिर्यादी महिलेने एकत्र हॉटेलमध्ये सुरू करण्याचे ठरवले.

हेही वाचा: Pune Crime : पुण्यात चक्क "काजू कतली"साठी तरुणांचा गोळीबारचा प्रयत्न; सीसीटीव्हीमध्ये...

दरम्यान, हॉटेल सुरू करण्यासंदर्भात चर्चा करण्याच्या बहाण्याने आरोपीने पीडित महिलेला खराडी भागातील घरी बोलावले. घरी आल्यानंतर आरोपीने पीडितेला कॉफीमध्ये गुंगीचे औषध दिले. काही वेळानंतर महिला बेशुद्ध झाल्यानंतर आरोपीने महिलेवर बलात्कार केला.

हा सर्व प्रकार संबंधित महिलेच्या लक्षात येताच तिने थेट पोलीस ठाणे गाठत ठाकूर विरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी ठाकूर याला अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.