
80 वर्षीय चित्रकाराचा अल्पवयीन मुलीवर 'डिजिटल रेप'; Digital Rape म्हणजे काय?
नोएडामध्ये एका घरकाम करणाऱ्या अल्पवयीन महिला मदतनीसावर सात वर्षांपासून डिजिटल दुष्कर्म केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी रविवारी एका 80 वर्षीय चित्रकाराला अटक केली. आरोपीवर पॉक्सो कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. सेक्टर-39 पोलिस स्टेशनचे प्रभारी राजीव बालियन यांनी सांगितले की, मूळचा प्रयागराजचा रहिवासी असलेला पेंटर मॉरिस रायडर सेक्टर-46 मध्ये राहतो. त्याच्यासोबत एक 17 वर्षांची नोकरही आहे. पोलिसांत दिलेल्या तक्रारीत पीडितेने आरोप केला आहे की, ती दहा वर्षांची असल्यापासून आरोपी तिच्यावर लैंगिक अत्याचार करत आहे. आरोपीचे व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंगही पोलिसांना देण्यात आले आहे. (Digital Rape: 80-year-old painter arrested, minor domestic help made serious allegations)
हेही वाचा: 'बलात्कार एक सरप्राइज सेक्स'; सनीला हे खळबळजनक ट्वीट करणं पडलं होतं महाग
जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर या वृद्धाला पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली. कलम 376, 323, 506 आणि पॉक्सो कायद्यांतर्गत आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिस पुरावे गोळा करून न्यायालयात सादर करण्याची तयारी करत आहेत.
डिजिटल बलात्कार म्हणजे काय? (What is Digital Rape?)
डिजिटल बलात्कार हा शब्द परदेशात गेल्या काही काळापासून वापरला जात आहे. आता देशाच्या कायद्यातही त्याचा वापर होत आहे. इंग्लिश डिक्शनरीमध्ये बोट, अंगठा, पायाचे बोट यांना डिजिट म्हटलं जातं. म्हणजेच बोटाने खाजगी भागाशी छेडछाड करणे याला डिजिटल बलात्कार म्हणतात.
हेही वाचा: धारावीत 19 वर्षांच्या विवाहित तरूणीवर घरात घुसून समूहिक बलात्कार
सांभाळ करण्याच्या निमित्ताने मुलीला आणलं घरी-
दरम्यान ज्या अल्पवयीन मुलीशी वृद्ध चित्रकाराने दुष्कर्म केलेली ती मॉरिसच्या शिमल्यामधील वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीची मुलगी आहे. मुलगी 10 वर्षाची असताना या चित्रकाराने तिचा सांभाळ करण्याच्या निमित्ताने तिला येथे आणलं आणि नंतर तिच्यावर अत्याचार करू लागला. तिने विरोध केल्यावर तिला तो मारहाणही करत असे. दरम्यान संबंधित वृद्ध चित्रकाराला पोलिसांनी अटक केली आहे.
Web Title: Digital Rape 80 Year Old Painter Arrested Minor Domestic Help Made Serious Allegations
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..