NCC : आरडीसीसाठी एनसीसीचे महाराष्ट्र संचालनालय रवाना

प्रजासत्ताक दिन शिबिरासाठी (आरडीसी) राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) महाराष्ट्र संचालनालय गुरुवारी (ता. २९) पुण्यातून रवाना झाले.
NCC
NCCSakal
Summary

प्रजासत्ताक दिन शिबिरासाठी (आरडीसी) राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) महाराष्ट्र संचालनालय गुरुवारी (ता. २९) पुण्यातून रवाना झाले.

पुणे - प्रजासत्ताक दिन शिबिरासाठी (आरडीसी) राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) महाराष्ट्र संचालनालय गुरुवारी (ता. २९) पुण्यातून रवाना झाले. पुणे एनसीसी मुख्यालयाचे ग्रुप कमांडर ब्रिगेडिअर अर्जुन मित्रा या संचालनालयाला आरडीसीसाठी शुभेच्छा दिल्या.

जानेवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यात देशाचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते आरडीसीचे उद्घाटन होणार आहे. तर २७ जानेवारी २०२३ रोजी पंतप्रधानांच्या रॅलीने आरडीसीची सांगता होणार आहे. एनसीसीच्या महाराष्ट्र संचालनालयाने २०२२ च्या प्रजासत्ताक दिन शिबिरात प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यावेळी आरडीसीमध्ये देशातील १७ संचालनालयांनी सहभाग घेतला होता.

तर २०२३ च्या आरडीसीसाठी राज्यभरातून निवडलेल्या कॅडेट्सने पुणे एनसीसी मुख्यालयात आयोजित प्रजासत्ताक दिनापूर्वीच्या शिबिरात गेल्या दोन महिन्यात तयारी केली. त्यामुळे महाराष्ट्र संचालनालय पुन्हा चमकदार कामगिरी करेल असा विश्र्वास एनसीसी मुख्यालयातर्फे व्यक्त करण्यात आला.

आरडीसी २०२३ साठी महाराष्ट्र संचालनालयात राज्यभरातून एकूण ११६ कॅडेट्सची निवड करण्यात आली आहे. दरम्यान आरडीसी २०२३ मध्ये संचालनालयातील कॅडेट्स राजपथावरील संचलन, गार्ड ऑफ ऑनर ऑफ पीएम रॅली, लाईन लेआउट, फ्लॅग एरिआ ब्रीफिंग, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध स्पर्धांमध्ये भाग घेणार आहेत.

महाराष्ट्र संचालनालयातील कॅडेट्स

आर्मी विंग - ८४

नेव्ही विंग - १६

एअरफोर्स विंग - १६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com