pune
punesakal

Sambhaji Raje : चित्रपटांच्या माध्यमातून खरा इतिहास लोकांपर्यंत जाणे गरजेचे : संभाजीराजे छत्रपती

'पुरंदरचा तह' पुस्तकाचे प्रकाशन छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्धनीती कौशल्य, स्वाभिमान, समाजकारण-राजकारण

सिंहगड रस्ता : छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्धनीती कौशल्य, स्वाभिमान, समाजकारण-राजकारण, स्वराज्य निर्मितीमागचा उद्देश आणि त्यांचे कार्य जनतेपर्यंत पोचवणे आवश्यक आहे. चित्रपटांच्या माध्यमातून खरा इतिहास लोकांपर्यंत जाणे गरजेचे आहे. चित्रपटांतून विकृतीचा इतिहास दाखवून सत्य लपवणे, गैर असून त्याविरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे, असे मत रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि माजी खासदार  संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात इतिहासातील एक महत्त्वाची घटना म्हणजे 'पुरंदरचा तह'. याच्या मूळ दस्तऐवजाचा मराठी अनुवाद करून पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आलेल्या  'पुरंदरचा तह' या पुस्तकाचे प्रकाशन  माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. 

मराठी देशा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. दामोदर मगदूम, छत्रपती शंभुराजे राज्याभिषेक ट्रस्टचे अमर जाधवराव, 'पुरंदरचा तह' पुस्तकाचे लेखक आणि राजस्थानच्या संग्रहालय आणि राज्य अभिलेखागार विभागाचे संचालक डॉ. महेंद्र खडगावत आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. 

"ज्या देशाची संस्कृती, सभ्यता भक्कम असेल, तो देश नक्कीच प्रगतीपथावर असेल. आपल्या देशाचा इतिहास आजच्या मुलांना सांगितला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरांत पोचला पाहिजे. त्यांचे चरित्र मुलांना शिकविल्यास ती मुले देशाचे उत्तम नागरिक बनतील," असे मत डॉ. खडगावत यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यात 'सतीशिळा वीरगण' या पुस्तकास राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल  लेखक अनिल  दुधाणे, स. मा. गर्गे यांच्या कन्या कविता भालेराव,  गिर्यारोहक गिरिजा लांडगे आणि प्रशांत विनोदे यांचा सत्कार या वेळी करण्यात आला. सिंहगड रस्ता येथील वीर बाजी पासलकर स्मारक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

'पुरंदरचा तह' या पुस्तकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती राजनीती कौशल्य दिसून येते. या पुस्तकाच्या माध्यमातून इतिहास जगासमोर येणार आहे, अशी माहिती माजी खासदार संभाजीराजे यांनी दिली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com