esakal | पुणेकर थंडीने गारठले!; किमान तापमान १०.४ अंश सेल्सिअसची नोंद 
sakal

बोलून बातमी शोधा

temperature-pune

पुण्यात रविवारी सकाळपर्यंत किमान तापमान दोन अंश सेल्सिअसने कमी होऊन १०.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. कमाल तापमानाचा पारा मात्र सरासरीच्या जवळपास म्हणजे २९.७ अंश सेल्सिअस नोंदला गेला.

पुणेकर थंडीने गारठले!; किमान तापमान १०.४ अंश सेल्सिअसची नोंद 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे -  पुणेकर शनिवारी थंडीने कुडकुडले. राज्यात रविवारी सकाळी साडेआठपर्यंत सर्वाधिक थंडी पुण्यात असल्याची नोंद हवामान खात्यात झाली. शिवाजीनगर येथील वेधशाळेत १०.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पुढील दोन दिवसांमध्ये हवेतील गारठा कायम राहील, असा अंदाजही हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला. 

बुरेवी चक्रीवादळानंतर शहर आणि परिसरातील आकाश मुख्यतः निरभ्र झाले. त्यामुळे उत्तरेतून राज्याच्या दिशेने वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढला. त्याचा थेट परिणाम पुण्यासह राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानाचा पारा कमी झाला, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

दीड गुंठ्यापर्यंत बांधकामासाठी महापालिकेकडे जाण्याची गरज नाही

पुण्यात रविवारी सकाळपर्यंत किमान तापमान दोन अंश सेल्सिअसने कमी होऊन १०.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. कमाल तापमानाचा पारा मात्र सरासरीच्या जवळपास म्हणजे २९.७ अंश सेल्सिअस नोंदला गेला. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान पुण्यात नोंदविले असल्याचे खात्यातर्फे सांगण्यात आले. 

शाळा सुरू झाली; पण शाळेत नेमके काय शिकवायचे; याबाबत शिक्षक संभ्रमात

 राज्यात थंडी वाढली
बंगालच्या उपसागरात गेल्या आठवडाभर धुमाकूळ घातलेल्या बुरेवी चक्रीवादळाचे उत्तरेकडून बाष्प ओढून घेतल्याने राज्यातील काही भागात थंडी वाढली आहे. मध्य महाराष्ट्रासह, मराठवाडा व विदर्भात काही भागांत थंड वाऱ्यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली  आहे. राज्यातील पुणे, नाशिक, निफाड, परभणी या भागातील किमान तापमान जवळपास दहा अंश सेल्सिअसच्या खाली व दरम्यान आहे. विदर्भात काहीशी थंडी असल्याने किमान तापमान १२ ते १८ अंश सेल्सिअस, मराठवाड्यात थंडीचा प्रवाह वाढल्याने किमान तापमान ८ ते १४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बुरेवी चक्रीवादळ गल्फ व मन्नार भागाजवळ निवळले असून, त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर झाले आहे. त्यामुळे काही प्रमाणात वारे वेगाने वाहत असले तरी येत्या सोमवारी (ता. ७) तमिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, दक्षिण केरळ, माहे, लक्षद्वीप या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तसेच अरबी समुद्र व मालदिव या परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती असल्याने त्याचा परिणाम कोकण किनारपट्टीजवळील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत होणार आहे. त्यामुळे या भागात गुरुवारी काही प्रमाणात अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक सरी पडतील.

loading image
go to top