यंदाच्या डिसेंबरमधील कमाल तापमानाची नोंद 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

पुणे : पहाटे हुडहुडी भरणारी थंडी... दुपारी जाणवणारा उन्हाचा कडाका अन्‌ कमाल व किमान तापमानातील तफावत वाढत आहे. राज्यात यंदाच्या डिसेंबरमध्ये आज सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. राज्यात भिरा येथे 37.5 अंश सेल्सिअस अशा उच्चांकी तापमानाची नोंद झाली. पुण्यातील तापमानाचा पारही 32.3 वर पोचला. 

राज्यात किमान तापमानात किंचितशी वाढ झाली असली, तरी थंडी कायम आहे. पहाटेला राज्यात बहुतांश ठिकाणी 10 अंशापेक्षा खाली किंवा त्याच्या आसपास तापमानाची नोंद होते; मात्र दुपारी उन्हाची तीव्रता प्रकर्षाने जाणवू लागते आणि उन्हाचे चटके बसू लागतात. जळगाव येथे आज 7.6 अंश सेल्सिअस असे राज्यातील नीचांकी तापमान नोंदले गेले. शहरात रविवारी पहाटे 10.9 अंश सेल्सिअस आणि दुपारी 32.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात आलेले 'वरदा' हे चक्रीवादळ निवळल्यानंतर राज्यातील तापमानात लक्षणीय घट झाली होती. नगरमधील पारा 5.9 अंश सेल्सिअसपर्यंत उतरला होता. पुण्यातही 8 अंशापर्यंत तापमान नोंदले गेले होते; मात्र राज्यात सध्या निरभ्र आकाश असल्याने दिवसा सूर्यप्रकाश अन्‌ दुपारी उन्हाचा चटका बसत आहे. दिवसा आणि रात्रीच्या तापमानातही मोठी तफावत असल्याचे दिसून येते. 

Web Title: Pune registers highest temperature in December