पुणे : रस्त्याच्या रुंदीकरणास रहिवाशांचा विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

road
पुणे : रस्त्याच्या रुंदीकरणास रहिवाशांचा विरोध

पुणे : रस्त्याच्या रुंदीकरणास रहिवाशांचा विरोध

पुणे - शिवाजीनगर येथील मेट्रो हबसाठी (Metro Hub) कृषी महाविद्यालय ते साखर संकुल दरम्यानच्या के. बी. जोशी या रस्त्याच्या रुंदीकरणास (Road Widening) तेथील रहिवाशांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून विरोध (Oppose) केला आहे. रुंदीकरण करावयाचे झाल्यास रस्त्याच्या डाव्या बाजूस संपूर्ण शासकीय जागा असून त्याबाजूनेच करावे, अशी मागणीही तेथील रहिवाशांनी पत्रकात केली आहे.

शिवाजीनगर येथील एसटी बसस्थनकाच्या जागेत महामेट्रोकडून मेट्रो हब उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या हबसाठी कृषी महाविद्यालय ते साखर संकुल दरम्यानच्या अस्तित्वात असलेल्या के. बी. जोशी मार्गांचे ३० मीटरपर्यंत रुंदीकरण प्रस्तावित करण्यात आले आहे. या रस्ता रुंदीकरणामध्ये रस्त्याच्या उजव्या बाजूस असलेल्या अनेक सोसायट्या बाधित होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या सोसायट्यांतील रहिवाशांनी एकत्र येत कृषी महाविद्यालय ते साखर संकुल मार्ग रहिवासी संघ स्थापन केले आहे. या संघाच्या वतीने महापालिका आयुक्तांना पत्र देऊन या रुंदीकरणास विरोध दर्शविला आहे. तसेच हा विरोध करताना पर्यायी मार्गही आयुक्तांना सुचविण्यात आले आहे.

विरोधाची कारणे...

१. रस्त्याचे ३० मीटर रस्ता रुंदीकरण आवश्यक नाही. कारण मेट्रोच्या शिवाजीनगर बस स्थानक व रेल्वे स्टेशनकडील रस्ता २४ मीटर रुंद आहे.

२. रस्त्यावरील दोन्ही बाजूने सुमारे १०० वर्षांची ८० ते ९० जुनी वडाची झाडे आहे, ती तोडण्यास विरोध

३. वडाच्या झाडांमुळे बऱ्याच प्रकारच्या पक्षांचा अधिवास आहे. झाडांचे संवर्धन अपरिहार्य आहे.

४. फर्ग्युसन रस्त्यावरील वाहतूक कृषी महाविद्यालय मुख्य प्रवेशद्वारावरून उजवीकडे वळून सिमला ऑफीस चौकाकडून शिवाजीनगर बस स्थानकातील मेट्रो स्टेशनकडे जात असल्याने या रस्त्याच्या रुंदीकरणाची आवश्यकता नाही

५. गणेशखिंड रस्त्यावरून २०१७ च्या विकास आराखड्यानंतर मेट्रोचे नियोजन केल्याने त्यानुसार वाहतूक सिमला ऑफिस चौकाकडे व शिवाजीनगर बस स्थानक, मेट्रो स्टेशन व रेल्वे स्टेशनकडे जाणार आहे.

६. हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोचे शिवाजीनगर स्थानक सिमला ऑफिस चौकात प्रस्तावीत असल्याने सर्वच वहातूक प्रत्यक्ष सिमला ऑफीस चौकाकडेच जाणार आहे.

७. रस्ता नुकताच दुरुस्त केलेला असून फुटपाथही नव्याने केले आहेत. ते करताना पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन, सीएनजी पाइपलाइन, इलेक्ट्रिक लाइन, ड्रेनेज लाइन इ. सोयीसुविधा नुकत्याच नव्याने दुरुस्त केलेल्या आहेत. हा सर्व खर्च वाया जाणार आहे.

८. रस्त्या उजव्या बाजूस संपूर्ण जुन्या इमारती आहे. रुंदीकरणामुळे त्या बाधित होणार आहे.

हेही वाचा: जनता वसाहतीजवळ कॅनॉलमध्ये कोसळली रिक्षा; चालक बेपत्ता

सुचविलेले पर्याय...

१. या रस्त्यावरील सीएनसी पेट्रोल पंप पीएमपीएमलच्या बससाठीच असल्याने इतर वाहनासाठी त्याचा वापर तातडीने बंद करावा.

२. पीएमएमएलच्या डेपोमध्ये बस आत जाण्यासाठी व बाहेर येण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार ताबडतोब करावे.

३. वाकडेवाडी येथील सबवेमधून फक्त दोन व तीनचाकी वाहने जाणेच अपेक्षीत आहे. त्यातून चारचाकी वाहनांची वहातूक बंद करावी.

४. रस्त्यावरील पीएमपीएमएल डेपोजवळील व साखर संकुल प्रवेशद्वारासमोरील अनधिकृत विक्रेते व इतर अतिक्रमणे काढून टाकावे.

५. रस्ता रुंदीकरण आवश्यक असेल, तर ते फक्त २४ मीटर रुंद असावे. वडाची जुनी झाडे वाचविण्यासाठी शासकीय जागेतून रुंदीकरण करण्यात यावे

Web Title: Pune Residents Oppose Widening Of Road

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneRoad Development
go to top