esakal | पुण्यदशम बससेवेला पुणेकरांची पसंती
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी रस्ता : ‘दहा रुपयांत शहराच्या मध्यवस्तीतून दिवसभर प्रवास’ या पुण्यदशम बसमध्ये बसलेले प्रवासी.

पुण्यदशम बससेवेला पुणेकरांची पसंती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहराच्या मध्यभागात दहा रुपयांत दिवसभर प्रवासाची सुविधा देणाऱ्या पुण्यदशम बससेवेतून पहिल्या पाच दिवसांत सुमारे ६० हजार प्रवाशांनी प्रवास केला असून त्यामुळे पीएमपीच्या तिजोरीत तीन लाख रुपयांचे उत्पन्न जमा झाले आहे.

पुण्यदशम बससेवेला ९ जुलै रोजी प्रारंभ झाला. त्यासाठी ५० मिडी बस उपलब्ध असून त्यातून प्रवासी दहा रुपयांत दिवसभर प्रवास करू शकतात. या बस सीएनजीवर धावणाऱ्या असून त्या वातानुकूल (एसी) बस आहेत. या बसमधून प्रवाशांना डेक्कन, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, पूलगेट, स्वारगेट दरम्यानच्या नऊ मार्गांवर या बस धावत आहेत. सुमारे ५ ते २० मिनिटे दरम्यान बसची वारंवारिता आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या बससेवेचे उद्‍घाटन झाले.

हेही वाचा: ‘वर्क फ्रॉम होम’मुळे ट्रॅव्हल कंपन्यांचे बिघडले गणित

या मार्गांवर आहे बससेवा

  1. पुणे स्टेशन ते शिवाजीनगर नवीन एसटी स्टँड (मार्ग) - कलेक्टर कचेरी, मनपा, शिवाजीनगर, वाकडेवाडी, मार्ग क्रमांक

  2. स्वारगेट ते शिवाजीनगर (मार्ग) - शनिपार, अप्पा बळवंत चौक, महापालिका, मंडई, मार्ग क्रमांक

  3. स्वारगेट ते पुणे स्टेशन (मार्ग) एस. पी. कॉलेज, केसरीवाडा, अप्पा बळवंत चौक, फडके हौद, मार्ग क्रमांक

  4. स्वारगेट ते शिवाजीनगर (मार्ग) एस. पी. कॉलेज, डेक्कन, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज, मार्ग क्रमांक

  5. स्वारगेट ते पुणे स्टेशन (मार्ग) नाना पेठ, पॉवर हाऊस, के. ई. एम. हॉस्पीटल, मार्ग क्रमांक

  6. स्वारगेट ते पुणे स्टेशन (मार्ग) नाना पेठ, सोन्या मारुती चौक, कमला नेहरू हॉस्पिटल, कस्तुरी चौक, मोमीन पुरा मार्ग क्रमांक

  7. महात्मा गांधी स्टँड ते डेक्कन (मार्ग) कासेवाडी, नाना पेठ, सोन्या मारुती चौक, लक्ष्मी रोड, डेक्कन, मार्ग क्रमांक

  8. पुणे स्टेशन ते डेक्कन (मार्ग) कलेक्टर कचेरी, अपोलो टॉकीज, वसंत टॉकीज, केसरीवाडा, मार्ग क्रमांक

  9. पुणे स्टेशन ते डेक्कन (मार्ग) - वेस्टएंड, नाना पेठ, सिटी पोस्ट, लक्ष्मी रोड

loading image