esakal | पुणे: रिंगरोडच्या मोजणीचे काम गतीने
sakal

बोलून बातमी शोधा

msrdc

पुणे: रिंगरोडच्या मोजणीचे काम गतीने

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे: पश्‍चिम भागातील रिंगरोडच्या मार्गिकेचे ९८ टक्के मोजणीचे काम पूर्ण झाले असताना पूर्व भागातील दुसऱ्या टप्प्यातील रिंगरोडच्या मोजणीचे काम गतीने सुरू केले आहे. आतापर्यंत पाच गावांतील रिंगरोडच्या मार्गिकेच्या मोजणीचे काम पूर्ण झाले आहे.

हेही वाचा: कुत्र्याचा राग मालकावर; कारची काच फोडून ४४ हजार लंपास

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडच्या पश्‍चिम भागातील मार्गाच्या मोजणीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यापाठोपाठ पूर्व भागातील रिंगरोडच्या मोजणीचे काम महामंडळाने सुरू केले. हा टप्पा सुमारे ६२ किलोमीटर लांबीचा असणार आहे. चार तालुक्‍यातून तो जाणार आहे.

नगर रस्त्यावरील मरकळपासून तो सुरू होणार असून पुणे-सातारा रस्त्यावरील वरवे बुद्रूक येथे येऊन मिळणार आहे. पुरंदर येथील प्रस्तावित असलेल्या पुरंदर विमानतळावर जाण्यासाठीचा मार्गदेखील उपलब्ध असल्याचे ‘एमएसआरडीसी’चे उपविभागीय अभियंता संदीप पाटील यांनी सांगितले.

असा असेल दुसरा टप्पा....

‘एमएसआरडीसी’कडून पहिल्या टप्प्यात ६६ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे तर दुसऱ्या टप्प्यातील पूर्व भागातील रिंगरोडचे काम हाती घेण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील रिंगरोड हा मरकळ, सोळू, लोणीकंद, भिवरी, कोरेगाव मुळ, सानोरी, दिवे, चांबळी, हिवरे, गराडे, कांबरी, वरवे बुद्रूक असा असणार आहे. त्यापैकी चिंबळी, गराडे, सोनोरी, पेरणे आणि उर्से या गावातील सुमारे १०७ हेक्टर जागेच्या मोजणीचे काम पूर्ण झाले आहे.

‘एमएसआरडीसी’चा रिंगरोड

एकूण लांबी - सुमारे १७० कि.मी

कोणत्या तालुक्यांतून जाणार - खेड, शिरूर, पुरंदर, हवेली, भोर, वेल्हे आणि मुळशी

जागेची आवश्‍यकता - २३०० हेक्‍टर

प्रकल्पासाठी अपेक्षित खर्च - सुमारे १४ हजार कोटी

loading image
go to top