esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

नालेसफाई

धायरी : नालेसफाई कागदोपत्रीच ; थोड्या पावसानेही तुंबतात नाले

sakal_logo
By
विठ्ठल तांबे

धायरी : पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील नाल्यांची संपूर्ण साफसफाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त  यांनी प्रशासनाला दिले. मात्र नाले सफाईचा केवळ देखावा झाला. प्रत्यक्षात नाल्यांमध्ये तुडुंब घाण, कचरा असल्याचे परिस्थिती पाहता लक्षात येते. कोणत्याही कामाचे टेंडर निघाल्यापासून काम पूर्ण होईपर्यंत कागदी घोडे नाचवण्याचे काम प्रभाग स्तरावर सुरू असल्याने कामे देखाव्यापुरती होत असल्याच्या तक्रारी आहेत. कामाची बिले निघाली परंतु नाले सफाई मात्र होताना दिसत नाही.

महापालिका आयुक्तांच्या आदेशाला संबंधित विभागांनी सोयीस्करपणे केराची टोपली दाखविल्याचे पहायला मिळत आहे. सिंहगड रस्ता परिसरातील धायरी, वडगाव बुद्रुक , वडगाव खुर्द अशा विविध भागांमध्ये नाल्यांमध्ये अद्यापही केरकचरा, घाण पहायला मिळत आहे. वडगाव धायरी मध्ये उन्हाळ्यात झालेली नालेसफाई फक्त कागदोपत्री काम पूर्ण केल्याचे चित्र निर्माण करणारी आहे. परिसरात मोठा पाऊस झाला नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली नसली तरी, मध्यम स्वरुपाच्या पावसामुळेही नाले तुंबल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून होताना दिसतात. एकूण हलगर्जीपणा,आणि दुर्लक्षामुळे कामे केली तरी अडचण, न करूनही अडचण अशी परिस्थिती ठेकेदार व 'माननीय' मंडळीची बनली आहे. नालेसफाईचे काम पूर्ण न झाल्यामुळे पावसाच्या पाण्यासोबत दुर्गंधीयुक्त पाणी नदीपात्रात मिसळत आहे. तसेच प्लॅस्टिक कागद व कचरा नदीपात्रात जात आहे. यामुळे प्रदूषणात भर पडते. यामध्ये सर्वसामान्य जनता भरडली जात असल्याचे मत  राजू शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा: बँकेचे नावलौकिक वाढण्यासाठी प्रयत्न करावेत : सदाशिव सपकाळ

सिंहगड रस्ता परिसरातील अभिरुची मॉल शेजारी नाला सफाई करताना जीव धोक्यात घालून कर्मचारी काम करत आहे. नाल्या मध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक जुन्या गाड्या व इतर कचरा साचला आहे. पावसाळ्या पूर्वी केलेल्या नालेसफाईचे काय झाले .पुन्हा नालेसफाई करण्याची वेळ का अली.पुन्हा एक दोन कर्मचारी लावून काम करत आहे .या मध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो आहे.नालेसफाईची चौकशी व्हावी.

-हरिश्चंद्र दांगट माजी नगरसेवक

वडगाव स्मशानभूमी जवळील ओढा : नऱ्हेकडून नवले इंडस्ट्री, अभिरुची मॉल, महालक्ष्मी मंदिर, वडगाव स्मशानभूमी पुढे प्रयेजा सिटी तसेच वडगाव बुद्रुक येथील पाऊजाई मंदिर, पासून सिंहगड रस्ता व धायरी येथील रायकार मळा ,सावित्री गार्डन,तो पुढे सिंहगड रस्ता परिसरातील नाल्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या, चिंध्या, मोठ्या प्रमाणावर गाळ दिसून येत आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होऊन पाणी साचून राहत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे.

loading image
go to top