esakal | Satara: बँकेचे नावलौकिक वाढण्यासाठी प्रयत्न करावेत : सदाशिव सपकाळ
sakal

बोलून बातमी शोधा

जावळी सहकारी बँक

बँकेचे नावलौकिक वाढण्यासाठी प्रयत्न करावेत : सदाशिव सपकाळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

केळघर : दत्तात्रय महाराज कळंबे यांनी मोठ्या त्यागातून व कष्टातून जावळी सहकारी बँक उभी केली आहे. ही बँक तालुक्याची अस्मिता असून स्पर्धेच्या युगात बँकेत राजकारण न आणता सक्षमपणे काम करून बँक फायद्यात आणण्यासाठी संचालक मंडळाने काम करावे, बँकेच्या गोलदेऊळ कार्यालयाच्या विक्रीचा प्रश्न सहमतीने सोडवावा. व थकीत कर्जांची वसुली लवकरात लवकर करून बँकेचे नावलौकिक वाढण्यासाठी प्रयत्न करावेत,असे आवाहन माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी केले.

दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेची ४८वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे अध्यक्ष राजाराम ओंबळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने मोजक्या सभासदांच्या उपस्थितीत मुंबईतील भायखळा येथील सावता माळी भुवन ट्रस्ट मध्ये संपन्न झाली .त्यावेळी सभासदांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

हेही वाचा: राज्यपाल भवन आता राजकीय अड्डा झालाय - नवाब मलिक

यावेळी वसंतराव मानकुमरे, अध्यक्ष राजाराम ओंबळे, उपाध्यक्ष भानुदास जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित कदम,शिवसेना संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, संचालक विक्रम भिलारे, चंद्रकांत गावडे, प्रकाश म्हसकर, हनुमंत पवार, आनंदराव सपकाळ, पवित्रा परामने, अस्मिता धनावडे, प्रकाश कोकरे, भरत सपकाळ, बजरंग सपकाळ, शिवाजी नवसारे, मोहन मानकुमरे, शांताराम आंग्रे, श्रीरंग सपकाळ, शिवाजीराव मर्ढेकर, चंद्रकांत पवार, विजयराव मोकाशी,मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रंगनाथन, मुख्य सरव्यवस्थापक तानाजी पवार, सरव्यवस्थापक दत्तात्रय कळंबे, माजी अध्यक्ष योगेश गोळे, माजी संचालक भगवान धनावडे, अरुण सुर्वे , कर्मचारी प्रतिनिधी प्रवीण शिंदे, अशोक चव्हाण, विजय सावले, राजेंद्र धनावडे, सचिन पार्टे ,के. के शेलार, विनोद शिंगटे, मच्छिन्द्र क्षीरसागर, विजय शेलार,आदींची उपस्थिती होती.प्रारंभी दत्तात्रय महाराज कळंबे व भिलारे गुरुजी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

यावेळी अमित कदम यांनी बँकेच्या गोलदेऊळ शाखा खरेदी प्रस्तावाला विरोध दर्शविला. ज्या जागेतून कळंबे महाराजांनी बँकेची मुहूर्तमेढ रोवली ती जागा विकण्याचा कुणालाच अधिकार नसल्याचे सांगितले.ही इमारत धोकादायक असेल तर इतर ठिकाणी भाडे कराराने घेऊन कार्यालय सुरू करावे, अशी सूचना केली. यावर वसंतराव मानकुमरे यांनी सांगितले, गोलदेऊळ कार्यालयाच्या इमारतीची जागा धोकादायक झाली असून ही इमारत पाडण्याचे पत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिले आहे. ही इमारत जुनी असल्याने ही इमारत पडण्याचा धोका आहे.येथे जागेचा अभाव असून पार्किंग ची सुविधा नाही.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यातील ४३ मंडळामध्ये अतिवृष्टी

तसेच सध्यस्थीतीत बँकेला भाड्याने जागा घेण्याचे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे ही जागा विकण्याचा निर्णय घेतला आहे. संचालक मंडळाने खर्चात काटकसर करून बँक नफ्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. यावेळी बँकेच्या सभासदांनी गोलदेऊळ शाखेची जागा विकण्यास विरोध केला. तसेच बँकेचा एनपीए वाढला असून बँक तोट्यात कशी गेली व पीएमसी बँकेत जावळी बँकेचे अडकलेले पैसे कधी मिळणार,बँकेने कोरोना काळात सामाजिक बांधीलकीतून काय मदत केली. असे विविध प्रश्न उपस्थित केले.माजी अध्यक्ष चंद्रकांत गावडे यांनी सभासदांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. ज्येष्ठ संचालक आनंदराव सपकाळ यांनी स्वागत केले. अध्यक्ष राजाराम ओंबळे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सभेला सभासद, माजी संचालक, कर्मचारी, उपस्थित होते.

loading image
go to top