Pune : आर.के.लक्ष्मण आणि कलादालनाच्या स्मारकाला इंटेलिजन्स २०२१ चा पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आर.के.लक्ष्मण आणि कलादालनाच्या स्मारकाला इंटेलिजन्स २०२१ चा पुरस्कार

आर.के.लक्ष्मण आणि कलादालनाच्या स्मारकाला इंटेलिजन्स २०२१ चा पुरस्कार

पुणे (आंबेगाव बुद्रुक) : पुणे महापालिकेच्या वतीने बालेवाडी येथील आर.के.लक्ष्मण स्मृती स्मारकासाठी बनविलेल्या इमारतीचे, खुल्या प्रदर्शन कक्षाची ऊत्कृष्ट निर्मिति केल्या बद्दल यासाठी परीश्रम घेतलेल्या व्यक्तींना IDAC कडुन दिला जाणारा इंटेलिजन्स २०२१ हा पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानीत करण्यात आले आहे.

यामध्ये,या इमारतीसाठीच्या आर्कीटेक्ट विभागाचा पुरस्कार युनीटेक्चर डिझाइन्स सोल्युशनचे धैर्यशील पवार यांना देण्यात आला.आर.के.लक्ष्मण कॅरिकेचर ड्रॉईंग्ज बनविण्यासाठीचा पुरस्कार आंबेगाव खुर्द, मोदक वस्ती जांभूळवाडी रस्ता येथील दी मल्टी आर्ट इफेक्टस,स्टुडिओचे उल्हास कागदे यांना तर डेकोडील्स आणि दी अॅक्सीस स्ट्रक्चर कन्सलटंटचे फसाड उभे करण्याबद्दल बापु मुळे, इंजिनीयर राजेश राटकलकर आदींना इंटीलीजन्स २०२१ चा IDAC इंटीलीजन्स सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.

हेही वाचा: वानखेडे कुटुंबियांविरोधातील नवाब मलिकांच्या आरोपांना लागणार ब्रेक!

या पुरस्कारासाठी पुणे विभागातून सर्वोत्कृष्ट तीन प्रोजेक्ट ची निवड दोन महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. दरम्यान, तीन प्रोजेक्ट पैकी आर.के.लक्ष्मण स्मृती स्मारकाची उत्कृष्ट उभारणीसाठी धैर्यशील पवार आणि टीमला इंटेलिजन्स २०२१ हा पुरस्कार देण्यात आला. आर्किटेक्ट धैर्यशील पवार यांचे मार्गदर्शनाखाली पुणे मनपाच्या या आर.के.लक्ष्मण आर्ट गॅलरीचे ड्राॅइंग साकारण्यात आले आहे. शिवाय, अमेरिका काँक्रेट इन्स्टिटयूटच्या पुरस्कारानेही पवार यांच्या संघाला सन्मानित करण्यात आले आहे.

loading image
go to top