सय्यदनगर : हांडेवारी रोडवर रस्ता कमी खड्डे जास्त, चेंबरही तुटले

सय्यदनगर-हांडेवाडी रस्त्याची ठिकठिकाणी दुर्दशा झाली आहे. अनेक ड्रेनेज लाईनची झाकणे तुटली आहेत.
हांडेवारी रोडवर रस्ता कमी खड्डे जास्त, चेंबरही तुटले
हांडेवारी रोडवर रस्ता कमी खड्डे जास्त, चेंबरही तुटलेsakal

उंड्री : सय्यदनगर-हांडेवाडी रस्त्याची ठिकठिकाणी दुर्दशा झाली आहे. अनेक ड्रेनेज लाईनची झाकणे तुटली आहेत. या रस्त्यावर स्ट्रीट लाईटचे दिवे नाहीत, पालिका प्रशासनाने रस्त्यातील खड्डे आणि चेंबरची तातडीने दुरुस्ती करावी, अशी आर्जवी मागणी सातवनगरमधील दिलीप निघोल यांनी केली.

हांडेवाडी ग्रामपंचायत नव्याने महापालिकेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर किमान रस्ते, वीज, पाणी अशा सुविधा मिळतील अशी आशा बाळगली होती. मात्र, अद्याप प्रमुख रस्तेही झाले नाहीत, स्ट्रीट लाईट नाही, रस्त्यातील खड्डे बुजले नाहीत, ड्रेनेज लाईनचे चेंबर ओव्हर फ्लो होऊन वाहत आहेत, पावसाने हजेरी लावताच या रस्त्यावर ठिकठिकाणी तळी साचत आहेत, अशा एक ना अनेक समस्यांचा पाढा येथील गृहिणी वैष्णवी सातव यांनी वाचून दाखविला.

हांडेवारी रोडवर रस्ता कमी खड्डे जास्त, चेंबरही तुटले
जेल की बेल? आर्यन खान 17 दिवसांपासून अटकेत; आज सुनावणी

हांडेवाडीतील रहिवाशी धनंजय हांडे म्हणाले की, हांडेवाडी रस्ता कमी खड्डे जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सातवनगरमधील अनेक चेंबर तुटले आहेत, त्या ठिकाणी नागरिकांनी झाडांच्या फांद्या टाकून वाहनचालकांना सावधानतेचा सूचक इशारा दिला आहे. ग्रामपंचायतनंतर महापालिकेत गाव समाविष्ट झाल्यानंतर सुविधा मिळतील. काही तरी सुरळीतपणा येईल, असे वाटले होते. मात्र, प्रशासनाच्या कारभारात काही सुधारणा दिसत नसल्याने ग्रामपंचायत बरी होती, असे म्हणण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com