
Pune Roads Full of Potholes CM Fadnavis Complains to PMC Chief Orders Immediate Repair
Esakal
Pune Potholes: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांना पुण्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा सामना करावा लागला. या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे तक्रार केलीय. पुण्यात रस्त्यांना खड्डे खूप पडलेत, रस्ते चांगले करा अशा सूचना त्यांनी केल्यात. या तक्रारीनंतर पथ विभागाचे मात्र धाबे दणाणले आहेत.