Pune : दरोडयाच्या प्रयत्नात असलेली टोळी जेरबंद; भिगवण पोलिसांची कामगिरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune : दरोडयाच्या प्रयत्नात असलेली टोळी जेरबंद; भिगवण पोलिसांची कामगिरी

Pune : दरोडयाच्या प्रयत्नात असलेली टोळी जेरबंद; भिगवण पोलिसांची कामगिरी

पुणे (भिगवण) : येथील ऱाष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडयाच्या तयारीत असलेली दरोडेखोरांची टोळी जेरबंद करण्यात भिगवण पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी केलेल्या वेगवान हालचालींमुळे टोळीतील तीन जणांना अटक करण्यात आली असुन आरोपींकडुन शस्त्रे व रोख रक्कम जप्त केली आहे. पोलिसांनी केलेल्या या कामगिरीबद्द त्यांचे कौतुक होत आहे.

दरोडयाच्या तयारीत असलेल्या संदीप आनंद हिरगुडे(वय. ३४ रा. हारनस ता.भोर)अनिकेत विलास सुकाळे(वय.२३ रा. कांबरे, ता.भोर) रामदास उर्फ युवराज ज्ञानोबा शेलार(वय. ३३ रा. वाकम्बे,ता. भोर) यांना पोलिसांनी अटक केली असुन शंभुराज मच्छिंद्र जेधे(रा. आंबवडे, ता. भोर) व पुनित(पुर्ण नाव माहिती नाही) हेही या दरोडयात सामील असल्याचे अटक केलेल्या आरोपींनी सांगितले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः येथील सोनाज पेट्रोल पंपाजवळ सोमवारी(ता.२२) पहाटे तीन ते चारच्या सुमारास काही चोरटे दरोडयाच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक दडस पाटील, रुपेश कदम, पोलिस अंमलदार इन्कलाब पठाण, समीर करे, आप्पा भांडवलकर, रामदास जाधव, सचिन पवार, अंकुश माने, शंकर निंबाळकर, सुभाष गडदे आदींनी सापळा रचुन छापा टाकुन यातील तीन आरोपींना शस्त्रासह जेरबंद केले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे अधिक चौकशी केली असता या दरोडयांमध्ये आणखी दोन जण सहभागी असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिासानी आरोपींकडुन एक गावठी पिस्तुल,पाच जिवंत काडतुसे, एक लोखंडी कटावणी, एक चाकु, एक रस्सी, मिरपुड व एक होंडा कंपनीची मोटार सायकल असा एकुण १ लाख ५ हजार दोनशे रुपयांचा मु्द्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पाच आरोपींविरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख,अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार व भिगवण पोलिस करीत आहेत.

हेही वाचा: सत्ता दिल्यास प्रत्येक महिलेला महिन्याकाठी हजार रुपये: केजरीवाल

मागील काही दिवसांमध्ये इंदापुर व दौंड तालुक्यामध्ये चोऱ्या व दरोडयांच्या प्रमाणात लक्षणिय वाढ झाली आहे. सोमवारी(ता.२२) पहाटे भिगवण पोलिसांनी छापा टाकुन दरोडयाच्या तयारीत असलेल्या टोळीला जेरबंद केल्यामुळे चोरी व दरोडयासारख्या प्रकारांना काही प्रमाणात आळा बसेल अशी अपेक्षा सामान्य नागरिकांमधुन व्यक्त होत आहे.

loading image
go to top