'नृत्यार्थी कलाक्षेत्रम'ला समूह नृत्यात सुवर्णपदक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

पुणे : सहाव्या "कल्चरल ऑलिंपियाड'मध्ये नृत्यार्थी कलाक्षेत्रमच्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्य स्पर्धेत सुवर्णपदक, तर एकल नृत्यात उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या "ग्लोबल कौन्सिल ऑफ आर्ट अँड कल्चर'तर्फे श्रीलंकेतील कोलंबो येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

समूह नृत्य स्पर्धेत श्रेया समाजगोल, श्रुतिका देसाई, गायत्री मोघे आणि श्‍वेता येलमामे यांनी सहभाग घेतला, तर प्रसन्न भुजबळ हिने एकल नृत्य सादर केले. नृत्यगुरू राजसी वाघ यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

सतारवादक सुब्रता डे व आंतरराष्ट्रीय भरतनाट्यम नृत्यांगना पद्मिनी कुमार यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या वेळी संघाच्या अध्यक्षा रत्ना वाघ, सचिव हेमंत वाघ, साहित्यिक श्‍याम भुर्के उपस्थित होते. या स्पर्धेत भारतातून 608 जणांनी सहभाग घेतला. त्यातील 500 कलाकारांनी 15 समूह नृत्य, एकल नृत्य, लघुनाट्य, गायन आणि वादन सादर केले.

Web Title: pune rocks at cultural olympiad