पुणे : बाकडे, बकेट आणि पिशव्यांवर होणार १६ कोटीची उधळपट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation

पुणे : बाकडे, बकेट आणि पिशव्यांवर होणार १६ कोटीची उधळपट्टी

sakal_logo
By
ब्रिजमोहन पाटील -सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. २२ : बाकडे, बकेट, ढकलगाडी, पिशव्या खरेदीवर महापालिका आयुक्तांनी बंदी आणलेली असताना आज (सोमवार) महापालिकेच्या मुख्यसभेत सत्ताधारी व विरोधक नगरसेवकांनी एकत्र येऊन ही बंदी उठवली आहे. महापालिका निवडणूकांच्या तोंडावर आता

१६२ नगसेवकांना ५ लाख रुपये बेंचसाठी तर बकेट, पिशव्या, ढकलगाडीसाठी ५ लाख रुपये उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.

नगरसेवकांकडून दरवर्षी वाॅर्ड स्तरीय निधीतून नगरसेवक कचऱ्याचे बकेट, बाकडे, कापडी पिशव्या, कचऱ्याच्या ढकल गाड्यांसाठी निधी खर्च करतात. पण नेमका त्याच वापर कुठे होते हे कळत नसल्याने यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्वयं संस्थांनी केला होता.

त्यातच शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला. महापालिकेचे उत्पन्न घटल्याने . शासनच्या आदेशानुसार महापालिकेने खर्चावर निर्बंध आणले. विकास कामे करायची असली तर वित्तीय समितीची मान्यता घेणे अनिवार्य केले.

महापालिकेच्या‌ सोमवारी झालेल्या मुख्य सभेत स्थायी समितीने आॅगस्ट २०१९ मध्ये मंजूर केलेला प्रस्ताव एकमताने मंजूर केला होता. या प्रस्तावानुसार क्षेत्रीय कार्यालय स्तरावर वॉर्ड स्तरीय निधी व अन्य वर्गीकरणातून एका प्रभागात ५ लाख रुपयांपर्यंत बेंच, ५ लाख रुपयांपर्यंत बकेट किंवा पिशव्या किंवा ढकलगाडी खरेदी करण्याच्या प्रस्तावास चर्चा न करता मान्यता देण्यात आली आहे.

हेही वाचा: सत्ता दिल्यास प्रत्येक महिलेला महिन्याकाठी हजार रुपये: केजरीवाल

महापालिकेत सध्या १६२ नगरसेवक असून प्रत्येक नगसेवकाला १० लाख रुपये या कामासाठी मिळणार असल्याने १६ कोटी २० लाख रुपये खर्च होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

साडे अकरा कोटीच्या पिशव्या

महापालिका आयुक्तांनी वाॅर्ड स्तरीय निधीवर बंधने आणण्यापूर्वी मार्च २०१७ ते मार्च २०२१ या कालावधीत तब्बल ११ कोटी ५७ लाख रुपयांच्या ज्युट व कापडी पिशवी खरेदीवर नगसेवकांनी खर्च केला होता. परिवर्तन संस्थेने केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.

loading image
go to top