

Pune RTE 2026: Massive Selection, April 20 Last Date for Admission
sakal
पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी सर्वसाधारण गटातील १ लाख ५ हजार २२९, तर दिव्यांग गटातील ५८२ बालकांची निवड करण्यात आली आहे. प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांचे प्रवेश शनिवारपासून (ता. ११) निश्चित करता येणार आहेत. बालकांच्या प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने २० एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे.