Pune RTO: आरटीओचा ‘कोटा’ अद्याप कागदावरच; दैनंदिन वाहन चाचणीचा घोळ कायम, परिवहन राज्यमंत्र्यांना निवेदन
Pune RTO Testing Quota Remains On Paper: पुणे RTO वाहन चाचणीचा कोटा ८०० वरून २५४ पर्यंत घटला, प्रत्यक्षात कोटा वाढ न झाल्यामुळे हजारो वाहनचालकांची चाचणी प्रलंबित. परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनकडून निवेदन.
पुणे : पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) वाहन चाचणीचा घोळ अद्यापही सुरूच आहे. वाहन चाचणीचा दैनंदिन कोटा ८०० हून २५४ वर आणला. याला विरोध झाल्यानंतर तो ६०० पर्यंत वाढविला.