
पुणे: पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक या बड्या हॉस्पिटलमध्ये घडलेल्या किडनी रॅकेटप्रकरणी आता आणखी एक मोठा खळबळजनक खुलासा झाला आहे. पुण्यातील राज्य शासनाचं रुग्णालय असलेल्या ससून हॉस्पिटलमधील एका बड्या माजी अधिकाऱ्याचाही यात सहभाग असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळं आता राज्य शासनापर्यंत याचे धागेदोरे पोहोचल्यानं यात आणखी काही महत्वाच्या घडामोडी समोर येण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये हा प्रकार घडला होता. याप्रकरणी तब्बल पंधरा जणांवर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.