

Diwali Tragedy Averted: Gas Cylinders Pulled Out as Fire Engulfs Pune Wada.
Sakal
पुणे : सदाशिव पेठेतील चिमण्या गणपती चौकात असलेल्या चव्हाण वाड्यात रविवारी (ता. १९) रात्री भीषण आग लागून चार घरांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले.