

Pune Car Crash: Tree Uprooted After High-Impact Collision
esakal
पुणे : संगमवाडी पार्किंग क्रमांक ३ परिसरात गुरुवारी एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या झाडाला कारने जोरदार धडक दिल्याने झाड खोडासकट उन्मळून फूटपाथवर कोसळले. या अपघातात कारमधील दोन जण अडकून पडले होते. नागरिक, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या संयुक्त प्रयत्नांतून दोघांची सुटका करण्यात आली.