esakal | पुणे : संगमवाडी येथील घरफोडीत आंतरराज्यातील टोळी
sakal

बोलून बातमी शोधा

crime

पुणे : संगमवाडी येथील घरफोडीत आंतरराज्यातील टोळी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

येरवडा : संगमवाडीतील माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्या पुतण्यांच्या बंगल्यात चोरी करणारे आंतरराज्यातील टोळी आहे. त्यांची ओळख पटली असून पुणे शहर आयुक्तालातील गुन्हे शाखा व येरवडा पोलिस समांतर तपास करीत आहे. त्यामुळे लवकरच दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या जातील अशी माहिती येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनूस शेख यांनी दिली.

गेल्या आवड्यात संगमवाडीत माजी आमदार रामाभऊ मोझे यांच्या पुतण्यांच्या बंगल्यात चोरी झाली होती. चोरट्यांनी तब्बल शंभर तोळे सोने लंपास केले. यामध्ये रोकड, चांदीचे दागिने आणि किंमती घड्याळांचा समावेश आहे. परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून तीन दररोडेखोरांना ओळखण्यात पोलिसांना यश आले आहे. हे दरोडेखोर रेकॉडवरील गुन्हेगार असून ते आंतरराज्यात घरफोडी करणारे आहेत.

हेही वाचा: सहकारनगरमध्ये पारंपरिक पद्धतीने विघ्नहर्त्याचे उत्साहात स्वागत

त्यांचा तपास गुन्हे शाखा व येरवडा पोलिस ठाण्यातील तपास पथक समांतर शोध घेत आहेत. त्यांच्या लवकरच मुसक्या आवळणार असल्याचे शेख यांनी सांगितले.

दरोडेखोरांचे सशक्त नेटवर्क

मोझे कुटुंबिय सुट्टीसाठी महाबळेश्‍वरला गेले होते. याची माहिती शेजाऱ्यांना सुध्दा नव्हती. मात्र याचा सुगावा दरोडेखोरांना कसा लागला त्यामुळे पोलिस चक्रावले आहेत. याचे उत्तर दरोडेखोरांना ताब्यात घेतल्यानंतरच समजले. त्यानंतरच अशा घरफोडीचे नेटवर्क समजू शकते, असे अधिकृत सुत्रांनी सांगितले.

loading image
go to top