

मंत्री चंद्रकांत पाटील आणि पुणे महानगरपालिकेच्या एका महिला नगरसेविकेबाबत यूट्यूबवर आक्षेपार्ह व लैंगिक शेरेबाजी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले युट्यूबर संतोष पंडित यांना पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. यू. वडगावकर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या हमीदारावर पंडित यांची सुटका करण्याचे आदेश दिले.