ससूनमधील वाहनचालकांना करावी लागतात घरगुती कामे

ससून सर्वोत्तम रुग्णालयातील वाहनचालकांना उघड्यावर बसून जेवण करावे लागत आहे.
ससून सर्वोत्तम रुग्णालयातील वाहनचालकांना उघड्यावर बसून जेवण करावे लागत आहे.

पुणे : ससून सर्वोत्तम रुग्णालयातील काही अधिकारी वाहनचालकांना नियमबाह्य घरगुती कामे करायला लावत असून, अपमानास्पद वागणूक देत आहेत, अशी लेखी तक्रार वाहनचालकांनी अधिष्ठाता यांच्याकडे केली आहे.

वाहनचालकांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे की, 'रुग्णालयातील काही अधिकारी जबरदस्तीने घरगुती व नियमबाह्य काम करून घेत आहेत. अपमानास्पद वागणूक देत असल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहनचालकांना वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये काम करावे लागत असल्याने कक्ष दिला आहे. परंतु, तो जाणीवपूर्वक बंद ठेवला जात आहे. यामुळे वाहनचालकांना उघड्यावर बसून जेवण करावे लागत आहे. संबंधित अधिकाऱयांचे काम हे शासकीय नियमास धरून नसून, चुकीचे व बेजबाबदार आहे.'

'बॅटरी ऑपरेटर व्हेईकल हे रुग्णांना तत्काळ घेऊन जाण्यासाठी देण्यात आले आहे. परंतु, वरिष्ठ अधिकारी हे दबाव तंत्राचा वापर करून सदर वाहन फक्त मृतदेहाची वाहतूक करण्यासाठी करून घेत आहेत. शिवाय, रुग्णवाहिकांमधून मृतदेहाची जबरदस्तीने वाहतूक करून घेत आहेत, असेही तक्रारी मध्ये म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com