Pune Satara Highway Accident : पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; कंटेनरने 5 वाहनांना उडवलं, पाच जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर
Pune Satara Highway Accident News : अपघातात जीवितहानी झाली नसली, तरी पाच जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवले.
Pune Satara Highway Accident : पुणे-सातारा महामार्गावर वेळू गावाच्या हद्दीत आज सकाळी भीषण अपघात झाला. नियंत्रण सुटलेल्या कंटेनरने सलग पाच वाहनांना (Container Hits Five Vehicles) जोरदार धडक दिल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला.