
शिक्षकाचे आणि विद्यार्थी यांचं नातं हे घट्ट असते. शिक्षणाविषयी गोडी निर्माण करणाऱ्या शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांना एक वेगळाच जिव्हाळा निर्माण होतो. पण तेव्हा विद्यार्थ्यांचे हृदय भरून येते. असाच काहीसा प्रकार पुण्यातील साधना प्राथमिक विद्यामंदिरात समोर आला आहे. आपल्या शिक्षिकेची बदली झाली हे कळताच तिसरीच्या वर्गातील विद्यार्थी ढसाढसा रडू लागले, तर एका चिमुकल्याने त्यांची बदली रद्द करावी म्हणून थेट शरद पवारांना विनंती पत्रच लिहिले आहे.