पुणे : शाळांना पुन्हा आठवडाभराची सुटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

School

पुणे : शाळांना पुन्हा आठवडाभराची सुटी

पुणे ः राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणानिमित्त दोन दिवस भरलेल्या शाळांना पुन्हा एकदा आठवडाभराची सुटी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षक, शाळा आणि पालकांच्या दबावानंतर शिक्षण विभागाने दिवाळीची उर्वरित सुटी शनिवार (ता.१३) ते शुक्रवार (ता.१८) पर्यंत वाढविली आहे. तर शुक्रवारी (ता.१९) गुरूनानक जयंती असल्याने आता थेट शनिवारी (ता.२०) वर्ग उघडण्यात येणार आहे, यासंबंधी जिल्हा परिषदेच्या माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांनी परिपत्रक जाहीर केले आहे.

हेही वाचा: T20 World Cup : २०२१ मध्ये मिळणार नवा चॅम्पियन

शहरात आठवी ते बारावी आणि जिल्ह्यात पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग गुरुवार (ता.११) पासून सुरू करण्यात आले आहेत. दिवाळीच्या उर्वरित सुट्या नाताळ किंवा उन्हाळ्यात देण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आला होता. मात्र या निर्णयावरून शिक्षण संघटना आणि प्रशासनात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. आता शिक्षणविभागाने आधीच्या आदेशात बदल करत दिवाळीच्या उर्वरित सुट्या जाहीर केल्या आहेत. तेंव्हा आता खऱ्या अर्थाने २२ नोव्हेंबरला सोमवारी शाळा खुल्या होतील.

loading image
go to top