पुण्याची जागा कॉंग्रेसचीच 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

पुणे - पुणे शहर लोकसभेची जागा कॉंग्रेसचीच आहे, त्यामुळे ही जागा पक्षाकडेच ठेवा. पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील, त्याचे काम एकदिलाने करू, असा एकीचा सूर शहर कॉंग्रेसच्या नेत्यांनी मुंबई येथील बैठकीत गुरुवारी पक्षश्रेष्ठींसमोर आळवला. राष्ट्रवादीपेक्षा कॉंग्रेसची पुण्यात जास्त ताकद आहे, त्यामुळे राष्ट्रवादीने पुण्यात त्रास दिला, तर बारामतीत त्यांना त्रास देऊ, असेही काही पदाधिकाऱ्यांनी मत मांडले. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रदेश कॉंग्रेसने बैठक आयोजित केली होती. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, अनंतराव गाडगीळ, विश्वजित कदम, माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड, अरविंद शिंदे, संजय बालगुडे, सदानंद शेट्टी, दीप्ती चवधरी, नगरसेवक अजित दरेकर, रशीद शेख, माजी नगरसेवक सुधीर जानजोत आदी उपस्थित होते. राज्याचे प्रभारी असलेले मल्लिकार्जुन खर्गे बैठकीला उपस्थित राहणार होते, मात्र ते आलेच नाहीत. 

कॉंग्रेस पक्षाकडून लोकसभेसाठी मोहन जोशी, अभय छाजेड, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, बाळासाहेब शिवरकर, आमदार अनंतराव गाडगीळ हे इच्छुक आहेत. त्यांची नावे शहर कॉंग्रेसकडून यापूर्वीच प्रदेशाकडे पाठविण्यात आली आहेत. या नावांवर बैठकीत चर्चा झाली. उमेदवार निश्‍चित करताना शहर कॉंग्रेसने पाठविलेल्या नावांवर चर्चा करण्यात येईल. परंतु ऐनवेळी वेगळा उमेदवारही येऊ शकतो, असे पक्षश्रेष्ठींनी या वेळी निदर्शनास आणून दिले. त्यावर काही पदाधिकाऱ्यांबरोबरच इच्छुक असलेल्यांनी आपली मते व्यक्त करताना पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील त्याचे काम एकदिलाने करण्याची ग्वाही दिली. 

विश्‍वजित कदमांसाठी पुन्हा आग्रह 
उमेदवार देताना जात आणि पैसे हा निकष लावू नका. निवडून येण्याची क्षमता हा निकष असावा, असे मत काही जणांनी मांडले. शहर कॉंग्रेसने काही दिवसांपूर्वी एका हॉटेलमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला कॉंग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्यामुळे वाद निर्माण झाला होता. आजच्या बैठकीत हा विषय निघाला. त्यावरून आरोप- प्रत्यारोप होऊ लागल्यावर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मध्यस्थी करीत वादावर पडदा टाकला, तर युवक कॉंग्रेस आणि एनएसयूआयच्या शहराध्यक्षांनी लोकसभेसाठी विश्वजित कदम यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. 

Web Title: pune seat is only for Congress