पुणे आम्हाला सुरक्षित वाटते; काश्‍मिरी तरुणांची भावना

Pune City
Pune City

पुणे - भारत आणि पाकिस्तानच्या वादात काश्‍मिरी माणूस सापडला आहे. यात हिंदू किंवा मुसलमान नाही तर माणूस मारला जात आहे. तेथील अस्थिरतेला आम्ही कंटाळलो आहोत. शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत, सततच्या हिंसाचारातून बाहेर पडून आम्हालाही पुढे यायचे आहे. म्हणूनच काश्‍मीरबाहेर इतर राज्यांमध्ये आम्ही जात आहोत. यात पुण्यामध्ये आम्हाला सुरक्षित वाटते, अशी भावना काश्‍मिरी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.  

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील काश्‍मिरी तरुणांना टार्गेट करून त्यांच्यावर हल्ल्याच्या घटना ठिकठिकाणी घडत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या काही काश्‍मिरी तरुणांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी त्यांची मते मोकळेपणाने मांडली.

जिब्रान शहा म्हणाला, ‘‘पर्यटन आणि तेथील पाहुणचार या दोन गोष्टींसाठी काश्‍मीरची ओळख प्रसिद्ध आहे. पुणे शहरातील जे लोक काश्‍मीरला जाऊन आले असतील त्यांना काश्‍मिरी लोकांकडून मिळालेल्या पाहुणचाराविषयी आपण विचारू शकतो. पण कित्येक महिने लोकांच्या हाताला रोजगार मिळत नाही; अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.’’ 

‘‘दहशतवादी हल्ला किंवा कोणतीही कारवाई झाल्यानंतर तेथील परिस्थितीचा आम्हाला चांगलाच अनुभव आहे. त्यामुळे पुलवामा हल्ल्यानंतर देशभरातून येणाऱ्या संतापाच्या प्रतिक्रिया आम्ही समजू शकतो. पण यात आमचा काय दोष आहे. आम्ही स्वतःच त्याचे बळी आहोत.

यासाठीच आम्ही काश्‍मीर सोडून बाहेर पडलो आहोत. पण इथेही आमच्यावर हल्ले झाल्यास आम्ही कुठे जायचे? हे तुम्हीच सांगा, अशी व्यथा फैजल मिर्झा याने मांडली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आम्ही बाहेर पडलो आहोत. आम्हाला शिकायचे आहे. इतरांप्रमाणे सामान्य जीवन जगायचे आहे. एवढेच आमचे म्हणणे आहे. या पलीकडे आम्हाला काहीही नको. अशा आशयाच्या प्रतिक्रिया या काश्‍मिरी तरुणांनी व्यक्त केल्या.

मी माझ्या कुटुंबासोबत पुण्यात राहतो. आम्ही पुण्यातील नागरिकांना मनापासून धन्यवाद देतो, की त्यांनी आम्हाला कधीही बाहेरचे समजले नाही. त्यांनी आम्हाला मोकळेपणाने स्वीकारले.
- ओवेस वाणी, काश्‍मिरी विद्यार्थी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com