esakal | Pune : गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी सक्रिय कोरोना रुग्ण वाढले
sakal

बोलून बातमी शोधा

corona test

Pune : गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी सक्रिय कोरोना रुग्ण वाढले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी (ता.१) १३५ ने वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आता ६ हजार २२९ वर गेली आहे. गुरुवारी हाच आकडा सहा हजार ९४ इतका होता. शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यात ७६५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवसातील एकूण रुग्णांत पुणे शहरातील १५५ नवीन रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा: Antiviral गोळी करणार कोरोनाचा धोका कमी; अमेरिकन कंपनीचा दावा

शुक्रवारी दिवसभरात ६२४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी २ हजार ७२३ जण विविध रुग्णांलयात उपचार घेत आहेत. उर्वरित तीन हजार ५०६ जण गृह विलगीकरणात आहेत. जिल्ह्यात दिवसभरात सहा रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. एकूण सक्रिय कोरोना रुग्णांत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्वाधिक ३ हजार २९८ रुग्ण आहेत. पुणे शहरात १ हजार ५०२, पिंपरी चिंचवडमध्ये ८५७, नगरपालिका हद्दीत ५३० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ४२ सक्रिय कोरोना रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा: KKR vs PBKS: रंगतदार सामन्यात KL राहुलचं अर्धशतक

दिवसभरातील एकूण नवीन रुग्णांत पुणे शहरातील १५५ जणांसह पिंपरी चिंचवडमधील १३६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ४२५, नगरपालिका हद्दीतील ३७ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील १२ रुग्ण आहेत.

loading image
go to top