Pune Crime : ज्येष्ठ नागरिकाला डेटिंगचा मोह पडला महागात; तब्बल १ कोटी...

पुण्यात डेटिंग सर्व्हिसच्या नावाखाली 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करण्यात आली
Pune Crime
Pune CrimeEsakal

पुण्यात डेटिंग सर्व्हिसच्या नावाखाली 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करण्यात आली आहे. के. बी. टेलीकॉम या डेटिंग सर्व्हिस कंपनीच्या नावाखाली २ सायबर चोरट्यांनी तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. रजत सिन्हा, नेहा शर्मा तसेच इतर बँक खात्यात ज्यांना हे पैसे ट्रान्सफर झाले आहेत. अशा लोकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

78 वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीने या संदर्भात पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना नेहा शर्मा या नावाच्या व्यक्तीने एके दिवशी फोन आला. त्या व्यक्तीने त्यांची के.बी. टेलीकॉम ही डेटिंग कंपनी आहे असे सांगितले आणि आम्ही ज्येष्ठ नागरिकांना डेटिंग सर्व्हिस देतो असे सांगितले.

फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन आरोपीने डेटिंग सर्व्हिस देण्यासाठी त्यांच्याकडून सुरुवातीला काही पैसे ऑनलाईन भरा असे सांगितले. यानंतर देखील वेग वेगळी कारणे सांगत त्यांच्याकडून आरोपी यांनी पैसे उकळले.

Pune Crime
Satyajeet Tambe : अपक्ष म्हणून लढलो, अपक्षच राहणार; सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट केली भूमिका

यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना धमकी देण्यास सुरुवात केली. तुम्ही बेकायदेशीरपणे डेटिंग सर्व्हिस घेण्याचा प्रयत्न केलाय, आता तुमच्यावर गुन्हा दाखल होईल, समाजात बदनामी होईल, अशा धमक्या त्यांना येऊ लागल्या. या दबावाखाली त्यांनी आरोपींच्या बँक खात्यावर तब्बल एकूण 1 कोटी 2 लाख रुपये भरले. अखेर हताश झाल्यानंतर त्यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. पोलिसांकडून हे बँक खाते गोठवले असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

Pune Crime
Satyajeet Tambe : अपक्ष म्हणून लढलो, अपक्षच राहणार; सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट केली भूमिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com