व्यावसायिकाच्या बंगल्यात सोन्याच्या बांगड्यांची चोरी; नोकर दाम्पत्यानेच मारला डल्ला

In Pune Servant couple theft of gold bangles worth Rs 3 lakh from the businessman bungalow
In Pune Servant couple theft of gold bangles worth Rs 3 lakh from the businessman bungalow
Updated on

पुणे  ः व्यावसायिकाच्या घरात काम करणाऱ्या नोकर दाम्पत्यानेच घरात ठेवलेल्या तब्बल पावणे तीन लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या. या प्रकरणात अलंकार पोलिसांनी एकास अटक केली आहे. 

संजय काकेकर (वय 47) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कर्वेनगर येथील नवसह्याद्री सोसायटीमध्ये राहणाऱ्या 45 वर्षीय महिलेने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून काकेकर व त्याच्या पत्नीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिस उपनिरीक्षक धीरज गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती व्यावसायिक आहेत. ते त्यांच्या कुटुंबासह नवसह्याद्री सोसायटीमध्ये राहतात. दरम्यान फिर्यादी यांच्या पतीच्या गावाजवळ राहणाऱ्या एका दाम्पत्याला त्यांनी घरकाम करण्यासाठी त्यांच्या बंगल्यात ठेवले होते. दाम्पत्याला त्यांच्या बंगल्याच्या पार्कींगजवळील जागेतच राहण्यासाठी व्यवस्था केली होती. त्यामुळे या दाम्पत्याचा फिर्यादीच्या घरामध्ये कुटुंबातील सदस्यांसारखाच वावर होता. फिर्यादी गणेशोत्सवाच्या काळात गौरींना सजविण्यासाठी सोन्याचे दागिने शोधत होत्या, त्यावेळी त्यांना सोन्याच्या प्रत्येकी 15 ग्रॅम वजनाच्या चार बांगड्या सापडल्या नाहीत. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांनी पुन्हा बांगड्यांचे शोध घेतला. तरीही बांगड्या न सापडल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

दरम्यान, नोकर संजय काकेकर यास संशयावरून ताब्यात घेऊन विचारणा केली. तेव्हा, त्याने बांगड्या चोरल्याची कबुली दिली. पोलिसांकडून संशयित आरोपीकडून मुद्देमाल जप्त करण्याचे काम सुरू आहे. संशयित आरोपीकडून आणखी किंमती वस्तु मिळण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 

पुण्यात पाणीपुरवठ्याचे तीन-तेरा; पालिकेचा अजब कारभार, पेठांमध्येही टंचाई

(Edited by: sharayu kakade)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com