Fraud Case : सीरम इन्स्टिट्युट'च्या एक कोटी रुपयांच्या फसवणुकप्रकरणी आणखी सात जणांना अटक

सीरम इन्स्टिट्युटचे आदर पुनावाला यांच्या नावाने संस्थेच्या अधिकाऱ्यास व्हॉटस्‌अप मेसेज करुन एक कोटी रुपये उकळण्याच्या प्रकरणात पोलिसांनी आणखी सात जणांना अटक केली आहे.
Crime news
Crime newsesakal
Summary

सीरम इन्स्टिट्युटचे आदर पुनावाला यांच्या नावाने संस्थेच्या अधिकाऱ्यास व्हॉटस्‌अप मेसेज करुन एक कोटी रुपये उकळण्याच्या प्रकरणात पोलिसांनी आणखी सात जणांना अटक केली आहे.

पुणे - सीरम इन्स्टिट्युटचे आदर पुनावाला यांच्या नावाने संस्थेच्या अधिकाऱ्यास व्हॉटस्‌अप मेसेज करुन एक कोटी रुपये उकळण्याच्या प्रकरणात पोलिसांनी आणखी सात जणांना अटक केली आहे. फसवणुकीचे पैसे बॅंक खात्यावर जमा झालेल्या व्यक्तींचा अटक केलेल्या संशयित आरोपी विविध राज्यातील आहेत.

राजीव कुमार शिवजी प्रसाद, चंद्रभुषण आनंद सिंग, कन्हैयाकुमार संभु महंतो (तिघेही रा. सिवान, बिहार), रविंद्रकुमार हबुनाथ पटेल (रा.गहरपुर, वाराणसी, उत्तरप्रदेश), राबी कौशलप्रसाद गुप्ता (रा. देवा, मध्यप्रदेश), यासीर नाझीम खान (रा. मध्यप्रदेश), प्रसाद सत्यनारायण लोवुडू (रा. विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश) अशी अटक केलेल्या संशयति आरोपींची नावे आहेत. 'सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया'चे संचालक सतीश देशपांडे यांच्या मोबाईलवर 7 सप्टेंबर 2022 या दिवशी 'सीरम'चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांचा फोटो व्हाटस्‌अप डिपी ठेवून त्याद्वारे देशपांडे यांना 'मी मिटींगमध्ये व्यस्त आहेत. मला फोन करु नका, मी पाठविलेल्या 8 बॅंक खात्यावर तत्काळ रक्कम पाठवा' असा मेजेस आला.

देशपांडे यांना संबंधित मेसेज हा पुनावाला यांचाच आहे, असे भासविल्याने त्यांनी संबंधित बॅंक खात्यावर एक कोटी 1 लाख 554 रुपये इतकी रक्कम पाठवून दिली. दुसऱ्या दिवशी देशपांडे यांचे पुनावाला यांच्याशी फोनवरुन बोलणे झाले, तेव्हा, अशा प्रकारे रक्कम पाठविण्यास आपण सांगितले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर संस्थेचे वित्त व्यवस्थापकास सागर कित्तुर यालनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. दरम्यान, पोलिसांनी फसवणुक केलेले पैसे ज्या बॅंक खात्यावर पाठविण्यात आले, त्या खात्यावरी 13 लाख रुपयांची रक्कम तत्काळ गाठविली. त्यानंतर मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातुन बॅंक खात्यावर पैसे जमा झालेल्या सात जणांना ताब्यात घेतले. यापुर्वी पोलिसांनी एकास अटक केली आहे. मात्र या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

'सीरम इन्स्टिट्युटच्या एक कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात सात जणांना अटक केली आहे. तसेच 13 लाख रुपयांची रक्कम गोठविली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.'

- स्मार्तना पाटील, पोलिस उपायुक्त, परिमंडळ दोन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com