Pune Political Clash over Namaz Video
esakal
पुण्यातील शनिवारवाड्यात काही महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे यावरून महायुतीतील दोन पक्षही आमनेसामने आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे या प्रकरणावरून महायुतीतील दोन पक्षात वादाची ठिणगी पडली की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.