
Pune News: शिरूर तालुक्यातील कारेगाव परिसरात सोमवारी सायंकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांपैकी दोन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. ही दुर्घटना सायंकाळी साधारण ५:४५ वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे.