

Deputy CM Visits Leopard Attack Victims
Sakal
कवठे येमाई : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड व जांबूत परिसरात अवघ्या वीस दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात तिघांचा बळी गेला. या दुर्दैवी घटनांमध्ये जीव गमावलेल्या शिवन्या शैलेश बोंबे (वय साडेपाच), भागूबाई रंगनाथ जाधव (वय ७०) व रोहन विलास बोंबे (वय १३) या पीडित कुटुंबीयांची गुरुवारी (ता. ६) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरखेड येथे भेट घेत सांत्वन केले.