Pune : शिवजयंती निमित्त नारायणगाव ते किल्ले शिवनेरी सायकल व मोटार सायकल रॅली

सायकल रॅलीत साडे सातशे सायकल स्वार तर मोटर सायकल रॅलीत तीनशे मोटर सायकल स्वार सहभागी झाले होते.
शिवनेरी
शिवनेरी sakal

नारायणगाव : शिवजयंती निमित्त आज नारायणगाव ते किल्ले शिवनेरी दरम्यान शिवनेरी ॲथलेटिक्स सोसायटी शिवजन्मभूमी यांच्या वतीने सायकल रॅली तर सावित्रीबाई फुले महिला विकास संस्था यांच्या वतीने मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

सायकल रॅलीत साडे सातशे सायकल स्वार तर मोटर सायकल रॅलीत तीनशे मोटर सायकल स्वार सहभागी झाले होते. भगव्या साड्या व भगवे फेटे परिधान करून मोटार सायकल रॅलीत सहभागी झालेल्या महिला लक्ष वेधून घेत होत्या.या वेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर दुमदुमला होता.

आज सकाळी सात वाजता नारायणगाव येथील राजा शिवछत्रपती महाद्वार पूर्व वेस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन करून सायकल व मोटार सायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी छत्रपती संभाजी राजे उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा घराघरात पोहोचवण्याचे काम तरुण पिढी करत आहे. यामुळे मी आनंदीत झालो आहे.अशी भावना छत्रपती संभाजी राजे यांनी या वेळी व्यक्त केली.

येथील शेवंताई पेट्रोल पंपा जवळ झालेल्या कार्यक्रमांत सावित्रीबाई फुले महिला विकास संस्थेच्या संस्थापिका राजश्री बोरकर ,आकाश बोरकर व प्रियांका बोरकर यांच्या हस्ते छत्रपती संभाजी राजे यांचा सत्कार करण्यात आला.

सायकल व मोटार सायकल रॅलीचा समारोप जुन्नर येथील किल्ले शिवनेरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ करण्यात आला. युवा नेते अमित बेनके यांनी सायकल व मोटार सायकल रॅलीत सहभागी शिवभक्तांचे स्वागत केले.

मोटर सायकल रॅलीचे नियोजन राजश्री बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आकाश बोरकर, प्रियांका बोरकर, शितल ठुसे , रूपाली पाटे, शुभांगी फुलसुंदर, प्रगती नवले, पूनम वायकर , पुष्पा खैरे यांनी केले.सहभागी सर्व सायकलस्वारांना आमदार अतुल बेनके यांनी टी-शर्ट तर सरपंच योगेश पाटे, सरपंच राजेंद्र मेहेर यांच्या वतीने मेडल भेट देण्यात आले. रॅलीतील सहभागी शिवभक्तांच्या अल्पोपहाराची व्यवस्था जुन्नर येथे करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com