Pune Shivajinagar Court Gangwar History : ४२ वर्षांपूर्वीही शिवाजीनगर कोर्टाबाहेर झाला होता 'असाच' रक्तरंजित थरार! माळवदकर टोळीने घेतला होता बाळू आंदेकरचा बळी; वाचा पुण्यातील टोळीयुद्धाचा इतिहास

मंदार किवळेवरील हल्ल्यानंतर पुण्यातील ४२ वर्षांपूर्वीच्या घटनेला उजाळा; १७ जुलै १९८४ रोजी कोर्टाच्या आवारातच बाळू आंदेकरची तलवारींनी हत्या झाली होती आणि तिथूनच भडकले होते पुण्यातील भीषण गँगवॉर.
Shivajinagar court attack revives memory of Balu Andekar murder 42 years ago!

Shivajinagar court attack revives memory of Balu Andekar murder 42 years ago!

Sakal

Updated on: 

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवाराबाहेर बुधवारी (२५ नोव्हेंबर) मंदार किवळे याच्यावर भरदिवसा गोळीबार आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याने संपूर्ण शहर हादरले. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच, तब्बल ४२ वर्षांपूर्वी याच शिवाजीनगर कोर्टाच्या आवारात घडलेल्या एका तंतोतंत घटनेची आठवण पुन्हा ताजी झाली आहे. ही घटना होती बाळकृष्ण ऊर्फ बाळू आंदेकर याच्या हत्येची, ज्यातून पुण्यातील कुख्यात टोळीयुद्धाचा जन्म झाला होता.

Loading content, please wait...