Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

दोन्ही हातांना गंभीर दुखापत, डोक्याच्या मागील भागात फ्रॅक्चर आणि पाठीवर गोळी घासल्याच्या खुणा; भरदिवसा झालेल्या या थरारानंतर पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह.
Condition of Mandar Kivle injured in attack outside Shivajinagar court is critical!

Condition of Mandar Kivle injured in attack outside Shivajinagar court is critical!

Sakal

Updated on: 

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ बाहेर भरदिवसा झालेल्या गोळीबार आणि कोयत्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला मंदार मारुती किवळे याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाते डॉ. यल्लप्पा जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदारवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे आहेत," असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...