Shri M : अहंकारत्याग ही शून्यत्वाची पहिली पायरी; ‘शून्य’ पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन

‘आध्यात्मिक प्रवासात प्रगती करायची असेल, तर सर्वांत आधी अहंकाराचा त्याग करावा लागेल. मला बऱ्याच गोष्टींचे ज्ञान असेल; पण सर्व गोष्टींचे ज्ञान नाही.
Shunya Book publication
Shunya Book publicationsakal
Summary

‘आध्यात्मिक प्रवासात प्रगती करायची असेल, तर सर्वांत आधी अहंकाराचा त्याग करावा लागेल. मला बऱ्याच गोष्टींचे ज्ञान असेल; पण सर्व गोष्टींचे ज्ञान नाही.

पुणे - ‘आध्यात्मिक प्रवासात प्रगती करायची असेल, तर सर्वांत आधी अहंकाराचा त्याग करावा लागेल. मला बऱ्याच गोष्टींचे ज्ञान असेल; पण सर्व गोष्टींचे ज्ञान नाही. ज्याचे ज्ञान नाही, ते शिकण्याचा मी प्रयत्न करेल, असे आपण ठरवले पाहिजे. हीच शून्यत्वाकडे जाण्याची पहिली पायरी आहे,’ असे प्रतिपादन आध्यात्मिक गुरू श्री एम यांनी सोमवारी केले.

‘सकाळ प्रकाशना’तर्फे श्री एम यांच्या ‘शून्य’ या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, व्यवस्थापकीय संचालक आणि ‘एपी ग्लोबाले’चे अध्यक्ष अभिजित पवार, पुस्तकाचे अनुवादक अमेय नातू, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुकुल सुतावणे आदी उपस्थित होते.

‘शून्य’ या पुस्तकामागील भूमिका विशद करताना श्री एम म्हणाले, ‘‘श्रीमद्‍भागवतावरील प्रवचन मी इंग्रजीत करतो. कारण, हिंदीत प्रवचन करताना हे स्वामीजी काहीतरी उपदेश देत आहेत, असे तरुणांना वाटते. तेच मी इंग्रजीत काहीतरी कथा सांगतो आहे, असे म्हणून ते उत्सुकतेने ऐकतात. त्यामुळे या कादंबरीचे लेखन मी इंग्रजीत केले. कोणत्याही लेखनात कथासूत्र असले, तेव्हा त्यात रस निर्माण होतो. त्यामुळे ‘शून्य’चे लिखाण कथासूत्राभोवती गुंफले. केरळ मला परिचित असल्याने या कथेला केरळची पार्श्वभूमी आहे. साध्या-सोप्या अन् समजेल अशा भाषेत लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे.’’

‘आपल्याला परदेशी गोष्टींचे आकर्षण असते. तरुण मुले श्रीमद्‍भागवत वाचणार नाहीत, पण हॅरी पॉटर वाचतील. खरेतर भारतीय संस्कृतीत याहून मोठी जादू आहे. त्यामुळेच ‘हरपुत्र’ या भारतीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तिरेखेवरील काल्पनिक कथा मी लिहितो आहे,’ असे श्री एम यांनी सांगितले. ‘शून्य’ पुस्तक वाचल्यावर काय शिकायला मिळेल, या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, ‘‘या पुस्तकाला आधी काल्पनिक कथा म्हणून वाचा. दुसऱ्यांदा पुन्हा वाचायला घ्याल, त्या वेळी यावर विचार करा. हे पुस्तक वाचल्यावर काहीच कळाले नाही, असे तुम्हाला वाटले, तर तुम्ही योग्य पद्धतीने पुस्तक वाचले आहे, असे समजा.’’

‘अवधूतांचे अनुकरण करू नका’

‘अवधूत’ ही आध्यात्मिक क्षेत्रातील एक संकल्पना आहे. ‘अवधूत’ असणारे व्यक्ती आपल्या मनानुसार वागतात. त्यांची कृती चमत्कारिक वाटली, तरी त्या प्रत्येक कृतीमागे अर्थ असतो. त्यांना काहीही नियम व अटी नसतात. ‘अवधूत’ खूप कमी शिष्य करून घेतात. केवळ आपल्या उपस्थितीनेच आध्यात्मिक विकास घडवतात. ‘शून्य’ असाच एक अवधूत आहे. मी ज्या ज्या अवधूतांना भेटलो आहे, त्यांचे सार यात आहे. ‘अवधूत’ यांना तुम्ही गुरू मानत असाल, तरी त्यांचे अनुकरण करू नका, असा सल्ला श्री एम यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com