Sinhagad Fort Missing Boys: पुण्यात सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेली पाच मुलं बेपत्ता; शोधमोहीम सुरू

Sinhagad Fort Trekking Safety Concerns in Focus: रस्ता चुकला असल्याची जाणीव झाल्यानंतर त्या पाच मुलांनी सर्वात आधी काय केलं, ते जाणून घ्या?
Rescue teams conducting a search operation at Sinhagad Fort, Pune, after five boys went missing during a trekking trip.
Rescue teams conducting a search operation at Sinhagad Fort, Pune, after five boys went missing during a trekking trip.esakal
Updated on

Five Boy's Missing During Sinhagad Fort Trekking in Pune: पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेलेली पाच मुलं बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही मुलं ट्रेकिंगसाठी किल्ल्यावर गेली होती, मात्र रस्ता चुकल्याने ती भरकटली आहेत.  आता मुलांना शोधण्याचे प्रयत्न पोलिस, वनविभागासह स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुरू आहेत. 

या मुलांना जेव्हा आपण भरकलो आहोत, याची जाणीव झाली. तेव्हा त्यांनी आपल्या कुटुंबीयांना आणि मित्रांना व्हिडिओ करून याबाबत माहिती दिली. यानंतर मग याबाबत पोलिसांना माहिती दिली गेली आणि मग शोधमोहीम सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच सिंहगडावर एक युवक बेपत्ता झाला होता. चार दिवस त्याचा शोध सुरू होतो, अखेर तो सापडला. मात्र आता यानंतर पाच मुलं सिंहगडावर भरकटल्याचे समोर आले आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे सिंहगड किल्ल्यावरर ट्रेकिंगसाठी जाणाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे.

Rescue teams conducting a search operation at Sinhagad Fort, Pune, after five boys went missing during a trekking trip.
Arvind Kejriwal to Amit Shah : ‘’...अशा मंत्र्याने, पंतप्रधानांनीही त्यांचे पद सोडावे का?'’ ; केजरीवालांचा अमित शहांवर निशाणा!

सध्या पावसाळी वातावरणामुळे सिंहगडावर हिरवाई आणि परिसरात घनदाट जंगल निर्माण झाले आहे. तर पावसात ट्रेकिंगचा आनंद घेण्यासाठी अनेकजण सुट्टीच्या दिवशी सिंहगडावर जाणं पसंत करतात. अशावेळी काहीजण रस्ताही चुकत असल्याचे समोर येत आहे. आता या भरकटलेल्या पाच मुलांचा शोध घेणे युद्धपातळीवर सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com