Pune : सिंहगडावर कचरापेटीवर स्थानिक पक्षांची अत्यावशक सेवेची माहिती

सिंहगड परिवार फाऊंडेशन आणि फ्लीटगार्ड फिल्टर्सचा गडाचे आरोग्य जपण्यासाठी अभिनव उपक्रम
सिंहगड
सिंहगड sakal

खडकवासला : फक्त फिटनेस, व्यायाम, आरोग्य जपण्यासाठी आम्ही सिंहगडावर येत नाही. तर येथील निसर्गामुळे आमचे आरोग्य जपले जाते. त्याच्या संवर्धनासाठी सिंहगड परिवार फाऊंडेशने फ्लीटगार्ड फिल्टर्सच्या माध्यमातून सिंहगडावर २६ कचरापेट्या बसविल्या आहेत.

फाऊंडेशनने नवीन कचरापेट्या बसविण्याचा संकल्प केला. त्यास फ्लीटगार्ड फिल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडने सामाजिक दायित्व (सीएसआर) फंड उपलब्ध करून दिला. त्याचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा गडावर पुणे दरवाज्यात रंगला होता. सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुतळ्याचे पुजन फ्लीटगार्ड फिल्टर्सचे असिस्टंट जनरल मॅनेजर(एचआर) अविनाश माने यांचे हस्ते झाले.

कंपनीच्या सीएसआर प्रमुख प्रियांका चव्हाण, सिंहगडचे इतिहास अभ्यासक डॉ.नंदकिशोर मते, दुर्गवीर ॲड.मारूती गोळे, ‘पीएमपीएमएल’ प्रवासी मंचच जुगलकिशोर राठी, एसआरटी अल्ट्रा मॅरेथॉनचे अध्यक्ष दिग्विजय सर्जेराव जेधे उपस्थित होते. फ्लीटगार्ड फिल्टर्स कंपनीचा स्टॅाफ तसेच फाऊंडेशनने सिंहगडावर व पायवाटेला स्वच्छता अभियान राबवून ३० पोती प्लास्टिक कचरा गोळा केला. कचरापेट्या बसविण्यासाठी फाऊंडेशन आणि सह्याद्री प्रतिष्ठान, स्मार्ट सिटी पुणे जिल्हा यांनी संयुक्त विद्यमाने श्रमदानाची मोहिम राबविली.

पर्यावरण रक्षणासाठी कचरा गोळा करण्यासाठी पेटीचा उपक्रम चांगला आहे. त्याचबरोबर पेटीवर अत्यावशक सेवांची माहिती व फोन नंबर दिल्याने पर्यटकांना आप्तकालीन काळात फायदेशीर ठरेल.

-भाऊसाहेब ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी हवेली

सिंहगडाच्या पर्यावरणाच्या दृष्टीने सिंहगड परिवार सतत जागरूक असतो. काही सदस्य दर आठवड्याला, महिन्याला स्वच्छता मोहीम राबवितात. स्वतःच्या आरोग्याबरोबरच सिंहगडाचेही आरोग्य जपणारा हा परिवार आहे.

-डॉ.नंदकिशोर मते, सिंहगडचे इतिहास अभ्यासक

कचरा पेट्या चांगल्या प्रतीच्या गॅल्वनाइज्ड शीटच्या आहेत. मजबूत व टिकाऊ उत्तम प्रतीच्या २६ कचरापेट्या आहेत. त्यापेट्यावर परिसरात आढळणारे विविध पक्षांचा फोटो पेटीवर आहेत. तेथे क्युआर कोड लावला आहे. तो स्कॅन केला कि, त्याची माहिती मोबाईलवर उपलब्ध होईल. तसेच पेटीवर प्रथमोपचार पेटी, स्ट्रेचर, स्थानिक युवक, आप्तकालीन, बचत कार्यासाठी संपर्क यामध्ये हवेली पोलिस, बचाव पथक याची माहिती दिली आहे.

-ऍड.प्रकाश केदारी, सिंहगड परिवार फाऊंडेशन

सिंहगडावर १०-१५ वर्षांपूर्वी कचरा पेट्या लोकसहभागातून बसविल्या होत्या. त्या मोडकळीस आल्या होत्या. काही पावसामुळे गंजल्या होत्या. कचरा पेट्यातील कचऱ्याला आग लावल्यामुळे त्या खराब झाल्या होत्या.

-आशा करवंदे सिंहगड परिवार फाऊंडेशन

कचरा पेट्या खराब झाल्याने गडावर येणार पर्यटक विविध कचरा पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या कोठेही टाकत होते. तो कचरा गोळा करणे अवघड होते. म्हणून पेट्या बसविण्याचा विषय पुढे आला.

-किरणकुमार पाटील, सिंहगड परिवार फाऊंडेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com