Pune Municipal Staff Search for Missing Gold Necklace
esakal
सिंहगड रस्ता (जि. पुणे) : लग्नातील वीस वर्षांपूर्वीचा सोन्याचा हार कदम दाम्पत्याने गणरायाला घातला होता. विसर्जनाच्या गडबडीत तो मूर्तीसोबतच हौदात गेला. दुसऱ्या दिवशी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शोध घेतला असता हार मूर्तीला चिकटलेला (Pune gold necklace) सापडला. मात्र, मूर्तीला घातलेल्या सोन्याच्या अंगठीचा शोध अद्याप सुरू आहे. सुमारे बारा तासाने जवळपास पाच तोळ्याचा सोन्याचा हार कदम यांना परत मिळाला.