Pune SIR : ‘बीएलओ’ घरी येऊन कागदपत्रे स्वीकारणार जिल्हाधिकारी ; मतदारांनी तहसीलमध्ये येण्याची आवश्‍यकता नाही

SIR Notice Recipients Need Not Visit Tehsil Offices : पुण्यात SIR प्रक्रियेत नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी तहसील कार्यालयात जाण्याची आवश्यकता नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
Pune SIR

Pune SIR

esakal

Updated on: 

पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करण्यासाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ‘नो मॅपिंग’ किंवा तार्किक विसंगतीमुळे नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी तहसील कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही.

संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांच्या घरी भेट देऊन आवश्यक कागदपत्रे स्वीकारणार आहेत. त्यामुळे पात्र मतदारांना मतदार यादीत नावनोंदणी, दुरुस्ती तसेच हरकती नोंदविण्याची पुन्हा संधी उपलब्ध झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

Pune SIR
₹85 लाख CTC, पण हातात फक्त ₹3 लाख! बाकीचे पैसे कुठे जातात? कंपनीच्या वाइस प्रेसिडेंटनेच सांगितलं पगाराचं खरं गणित

मतदार यादीतील नोंदीमध्ये तार्किक विसंगती आढळून नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांनी सुनावणीसाठी तहसील कार्यालय, निवडणूक निर्णय अधिकारी (ईआरओ) किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी (एईआरओ) कार्यालयात गर्दी करण्याची आवश्यकता नाही. संबंधित मतदारांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.

बीएलओ घरी भेट देऊन कागदपत्रे स्वीकारतील. उपलब्ध सुविधेनुसार व्हॉट्सॲप किंवा ऑनलाइन माध्यमातूनही आवश्यक कागदपत्रे सादर करता येतील. संबंधित विसंगतीच्या अनुषंगाने प्राप्त कागदपत्रे, बीएलओचा अहवाल किंवा पंचनामा याआधारे प्रकरणाची कार्यवाही करण्यात येईल. कागदपत्रे अपूर्ण असल्यास आवश्यकतेनुसार अपवादात्मक परिस्थितीत ऑनलाइन सुनावणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Pune SIR
Petrol-Diesel Rate Hike: पेट्रोल ₹5 तर डिझेल 3 रुपयांनी महाग! नवे दर लागू; महाराष्ट्रात 1 लिटर आता कितीला?

वाढीव कालावधीत कोणताही पात्र मतदार नोंदणीपासून ऑनलाइन सुविधेचा लाभ घ्यावा प्रारूप मतदार यादीतील आपले नाव शोधणे, नवीन मतदार नोंदणीसाठी नमुना ६ भरणे तसेच मतदार यादीतील माहितीमध्ये दुरुस्तीसाठी नमुना ८ ऑनलाइन भरता येणार आहे. यासाठी केंद्र निवडणूक आयोगाच्या ‘वोटर हेल्पलाइन’ ॲपचा वापर करता येईल. एसआयआर कार्यक्रम, नोटीस, मतदार नोंदणी तसेच विशेष शिबिरांबाबत अधिक माहितीसाठी १९५० या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.

वंचित राहू नये, यासाठी ३, ४, १० आणि ११ ऑक्टोबरला जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये ५ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पात्र विद्यार्थ्यांची ऑनलाइन मतदार नोंदणी करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com