

Pune News Smart Toilets Expand But Lack of Night Shelters Leaves Migrant Workers Sleeping on Roads and Footpaths
sakal
-पांडुरंग सरोदे
पुणे: महापालिकेकडून शहराच्या प्रवेशद्वारावर ‘स्मार्ट टॉयलेट’ बांधण्याचे काम सुरू आहे, तेथे प्रवाशांना सशुल्क सोयीसुविधा दिल्या जातील. मात्र वाढत्या शहरीकरणात रोजगाराच्या शोधासाठी येणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी रात्र-निवाऱ्याची (नाइट शेल्टर) कुठलीच व्यवस्था महापालिकेकडून केली जात नसल्याची सद्यःस्थिती आहे. परिणामी कष्टकऱ्यांना आपल्या कुटुंबांसह ऊन-वारा पावसातच संपूर्ण रात्र रस्ते व पदपथांवरील अंधारात काढावी लागत असल्याचे वास्तव पुढे आले आहे.