पुणे : मीडिया समाजाचा आरसा आहे ; सम्राट फडणीस

सोशल मीडियावरील चित्र फसवे असू शकते
सम्राट फडणीस
सम्राट फडणीस sakal

उंड्री : एकेकाळी फक्त प्रिंट मीडिया होता, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाबरोबर वेब मीडिया आल्याने मोठा बदल झाला. १९९०च्या दशकात एक चॅनेल होते, आता एक हजार चॅनेल आणि जगातला मीडिया भारतात आला. मीडिया समाजाचा आरसा आहे. समाजाचे प्रतिबिंब दाखविणाऱ्या मीडियाला आता प्रशिक्षणाची गरज आहे. सोशल मीडियावरील चित्र फसवे असू शकते, त्याची विश्वासार्हता कमी आहे. प्रत्येकजण ५० वर्षानंतर मीडिया साक्षर असेल, असे दै. सकाळचे संपादक सम्राट फडणीस यांनी सांगितले.

पिसोळी (ता. हवेली) येथील ब्रह्माकुमारीज जगदम्बा भवन येथे स्वर्णिम भारत के लिए पत्रकारिता का योगदान या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. याप्रसंगी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, ज्येष्ठ पत्रकार उत्तमकुमार इंदोरे, रफिकलाल शेख, राजयोगी दशरथ भाई, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रभारी संचालक दयानंद कांबळे, प्रसिद्धी माध्यमाचे उपसंचालक डॉ. राजू पाथोडकर, महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी विभागाचे संचालक गोविंदा अहंकारी, ब्रह्माकुमारी सुलभा दीदी, मीडिया कोऑर्डिनेटर ब्रह्माकुमारी विद्या गोखले, मीरा सोसायटीच्या संचालिका नलिनी दीदी उपस्थित होत्या.

जगदंबा भवनच्या संचालिका सुनंदा दीदी म्हणाल्या की, लेखणीद्वारे पत्रकार समाजाला आकार देण्याचे काम करीत आहेत. कोरोना महामारीमध्ये जीव धोक्यात घालून समाजासाठी २४ बाय ७ मीडिया कार्यरत होता, ही कौतुकाची बाब आहे. सकारात्मकता समजून घेतली, तर मोठे परिवर्तन होईल. ब्रह्माकुमारीमध्ये लाखो महिला कार्यरत असून, आम्ही त्यांच्याकडे आत्मिक नजरेतून बघतो. स्वतःला बदलले, तर जग बदलेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

ब्रह्माकुमार कोमल भाई यांनी सांगितले की, पत्रकारसुद्धा माणूस आहे, सकारात्मकता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पत्रकारांपुढे मोठी आव्हाने आहेत. मात्र, लेखनीतून चांगले वातावरण करण्याचे काम ते करू शकतात, असे त्यांनी नमूद केले.

ब्रह्माकुमारी नलिनी दीदी यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com