
Pune : 'सोहळा तुमचा -आमचा समस्त सांगवी परिवाराचा' दिपोत्सव स्नेहमेळावा संपन्न
जुनी सांगवी (पुणे ): आकर्षक विद्युत रोषणाई,दिव्यांची आरास, सुर संगीताची मैफील व आकर्षक फुलांची सजावट करून कुटूबांसाठी लेझर शो,सेल्फी पॉईंटचा आनंद घेत समस्त सांगवी करांनी दिपोत्सवानिमित कुटूंबासमवेत 'सोहळा तुमचा- आमचा सांगवी परिवाराचा या स्नेहमेळाव्यास उत्स्फूर्त उपस्थिती लावली.समस्त शितोळे, ढमाले,ढोरे,पवार,पोंगडे,कांबळे,शिंदे, कुंभार,ठाकर,चव्हाण,माकर व समस्त सांगवी गावकरी परिवाराच्या वतीने माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी आयोजन या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते.
कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून सण उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमांना निर्बंध आले होते.सध्या परिस्थिती सुधारत असल्याने जुनी सांगवी करांनी मोठ्या उत्साहाने या दिपोत्सव स्नेहमेळाव्यास उपस्थिती लावली.केवळ सांगवीकरांचा आनंद लक्षात घेऊन बाळ गोपाळांसह सर्व वयोगट समोर ठेवून नियोजन करण्यात आले होते. दिव्यांच्या झगमगाटाने गजानन महाराज मंदीरासमोरील प्रांगण उजळले होते.परिसरात आकर्षक हलती रोषणाई करण्यात आली होती.विविध फुलांनी सजवलेला मंडप, फुलांनी सजवलेले फुलपाखरू ,हरणांचा कळप, सिंह अशा प्रतिकृती सेल्फी पॉईंट जुनी सांगवीकरांचे आकर्षण ठरत होते.
हेही वाचा: शासनाचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांना अमान्य; संप सुरुच राहणार!
यासोबत दिवाळी फराळ,संगीतमय मराठी,हिंदी गाण्यांची सुरेल मेजवानी,लेझर शो, नेत्रदीपक दिव्यांच्या रोषणाईने परिसर उजळून निघाला होता.सांगवीच्या या सोहळ्याला विविध सामाजिक कार्यकर्ते, राजकीय व्यक्तींनी भेट दिली.यात राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष संजोग वाघेरे, सचिन आहीर,खा.श्रीरंग बारणे,राजु मिसाळ,अजित गव्हाणे आदी मान्यवरांनी सोहळ्यास भेट दिली.मराठी मालिका देवमाणुस फेम अभिनेत्री अस्मिता देशमुख हिच्या उपस्थितीने सोहळ्यात रंगत आणली.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिनेत्री अस्मिता देशमुख हिस पिंपरी-चिंचवड भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.फ्युजन म्युझिकल ग्रुपचे नितिन कदम व सहका-यांनी उपस्थित रसिक श्रोत्यांना मराठी भावगीते, भजन, अभंग, मराठी हिंदी चित्रपटातील गाण्यांच्या सादरीकरणाने मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी पाडुळे यांनी केले.
"हा सोहळा समस्त सांगवी करांचा होता.गतवर्षापासून कोरोनामुळे एकही मोठा सांस्कृतीक कार्यक्रम झाला नव्हता.यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी सर्वसमावेशक नागरिक मित्र परिवार सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते. हा सोहळा करण्याचे मला भाग्य लाभले असे मी मानतो"
-प्रशांत शितोळे
Web Title: Pune Sohala Tumcha Aamcha Samast Sangvi Parivaracha Dipotsav
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..