

Pune-Solapur Highway Accident
esakal
Pune Solapur Highway accident today: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील राजवडी येथे शुक्रवारी (३० ऑक्टोबर) सकाळी मोठी दुर्घटना घडली. उड्डाणपुलाजवळ संरक्षण भिंतीचे बांधकाम आणि साईडपट्टीच्या भरावाचे काम सुरू असताना अचानक माती-मुरुम आणि डबराचा मोठा ढिगारा कोसळला. या दुर्घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला असून, दुसरा मजूर जखमी झाला आहे.