

Pune Solapur Highway Traffic Jam near Kedgaon
esakal
पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील केडगाव चौफुला परिसरात सोमवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. दोन्ही बाजूंना वाहनांच्या ५ ते ६ किलोमीटपर्यंत रांगा लागल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. मागील चार तासांहून अधिक काळ वाहने जागेवरच थांबली असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.